Eknath Khadse To Join BJP soon how khadse got entry despite the opposition of girish mahajan leaders in maharashtra marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाचा सोहळा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांच्या उपस्थितीत येत्या चार-पाच दिवसात पडणार आहे. राज्यातल्या काही नेत्यांच्या विरोधानंतरही केंद्रीय नेतृत्व खडसेंना पक्षात घेण्यासाठी कसं राजी झालं याचं अनेकांना आश्चर्य वाटतंय. 

महाराष्ट्र भाजपमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारा एक नेता आणि महाराष्ट्रातून दिल्लीत जाऊन स्वत:चं अस्तित्व निर्माण करणाऱ्या एका नेत्यानं खडसेंचा भाजप प्रवेश सुकर केल्याची माहिती आहे. पण खडसेंच्या भाजप प्रवेशामुळं राज्यातील भाजपचे काही नेते नाराज होण्याची शक्यता आहे. 

जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचं विळ्या-भोपळ्याचं नातं आहे. त्यामुळे खडसेंना भाजप प्रवेश महाजनांना किती रुचतो हे पाहावं लागेल. 

एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीतून आमदारकी

ऑक्टोबर 2020 मध्ये एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीनं खडसेंना विधानपरिषदेची आमदारकीही दिली. पण ज्या दिवशी खडसे आमदार झाले त्या दिवशीच एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं. खडसेंना मंत्रिपदाची आशा होती, पण मविआ सरकारच कोसळलं. 

मुलगी आणि सूनेच्या राजकारणाचा मार्ग मोकळा

आता खडसेंनी पुन्हा स्वगृही जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांपूर्वी एकनाथ खडसे भाजपमध्ये येणार की नंतर येणार याबाबत अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही. या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने एकनाथ खडसे यांच्यामागे सातत्याने केंद्रीय यंत्रणांचं सुरू असलेलं शुक्लकाष्ट आता बंद होईल, मुलगी रोहिणी खडसे आणि रक्षा खडसे यांच्या भविष्याचा मार्ग खडतर न राहता सोपा होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

खडसेंच्या विरोधकांच्या विरोधात दिल्लीत लॉबिंग? 

सध्या एकनाथ खडसे जरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असले तरी त्यांच्याच माध्यमातून रक्षा खडसे यांची रावेर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी निश्चित झाली असल्याची चर्चा आहे.  रावेरमधून गिरीश महाजन यांना हरिभाऊ जावळे यांच्या चिरंजीवाला उमेदवारी द्यायची होती. मात्र दिल्लीतील आपल्या जुन्या मित्रांचा पाठिंबा मिळवत एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभेची जागा स्वत:च्या सुनेकडे ठेवली. त्यामुळे राज्यातल्या खडसे विरोधकांच्या विरोधात केंद्रात दुसरी एक फळी कार्यरत असल्याचीही चर्चा सुरु झाली आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts