Shirur Loksabha Constituency atul deshmukh Resign Bjp shirur

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

शिरुर, पुणे :  शिरुरमध्ये (Shirur Loksabha Constituency) आढळराव पाटलांच्या (Adhalrao patil) उमेदवारीमुळे महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आढळराव पाटलांच्या उमेदवारीवरुन भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता भाजपाचे नेते आणि खेड आळंदी विधानसभेचे समन्वयक अतुल देशमुख भाजपातून बाहेर पडणार आहेत. भाजपाच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन आम्हीच तुम्हाला सोडतोय, अशी थेट भूमिका घेत अतुल देशमुखांचा भाजपाला रामराम ठोकणार आहे. भाजपातून बाहेर पडल्यानंतर काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. 

शिवाजी आढळराव पाटीलांच्या उमेदवारीनंतर भाजपात नाराजी सरुवाती पासून होती. मात्र ही नाराजी आता थेट राजीनाम्यापर्यंत येऊन पोहचली आहे. खेड आळंदी विधानसभेचे समन्वयक अतुल देशमुख भाजपातून बाहेर पडणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. अतुल देशमुख उत्तर पुणे जिल्ह्यात भाजपाचे मोठे नेतृत्व आहे. ज्या पक्षात काम करतो तेच आपला विचार करत नसल्याची खंत व्यक्त करत देशमुखांची नाराजी व्यक्त केली आहे.

शिरुर लोकसभा मतदार संघाच्या महायुतीचा जाहिर मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र या मेळाव्याला अतुल देशमुख गैरहजर होते. आढळराव पाटलांना उमेदवारी दिल्याने भाजपचे अनेक कार्यकर्ते नाराज असल्याचं दिसून येत आहे. प्रचारादरम्यानदेखील ही नाराजी दिसून आली. त्यानंतर बैठका बोलवून कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचं काम सुरु आहे. यासाठी तातडीनं बैठका घेतल्या जात आहे. कार्यकर्त्यांना सूचना केल्या जात आहेत. मात्र अतुल देशमुख यांनी आपली नाराजी व्यक्त करुन भाजपाच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन आम्हीच तुम्हाला सोडतोय अशी थेट भुमिका घेत अतुल देशमुखांचा भाजपाला रामराम ठोकला आहे. 

शिरुर लोकसभा मतदार संघात आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशी लढत होत आहे.  आढळराव पाटलांना निवडून आणण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न केला जात आहे. अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणार असा चंग अजित पवारांनी बांधला आहे. त्यातच ही निवडणूक अनेक अर्थाने अजित पवारांसाठी मोठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. असं असलं तरीही आढळराव पाटलांना उमेदवारी दिल्याने भाजपचे नेते कार्यकर्ते नाराज आहे. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

इतर महत्वाची बातमी-

Chandrashekhar Bawankule : श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी बावनकुळे मैदानात; मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी बारणे यांचा विजय महत्वाचा म्हणत कार्यकर्त्यांना बजावलं!

Ajit Pawar : मोठी बातमी! इंदापुरात शरद पवारांना धक्का, कट्टर समर्थक सोनाईचे माने कुटुंब अजित पवारांसोबत!

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts