Loanvala Crime news case has been registered against 10 people who create chaos Crime news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लोणावळा, पुणे : लोणावळ्यात सध्या हुल्लडबाजीचे (Lonavala Crime) प्रकार चांंगलेच वाढल्याचं दिसत आहे. आलिशान बंगल्यात पॉर्न व्हिडीओच्या शुटींगचा प्रकार ताजा असतानाच आता लोणावळ्यात रात्री अपरात्री गोंधळ घालणाऱ्या हुल्लडबाजावर कारवाई करण्यात आली आहे .लोणावळा शहरातील तुंगार्ली परिसरातील एस 4 नावाच्या बंगल्यातील प्रांगणात सिस्टम लावून मोठमोठ्याने गाणी लावून त्यांनी सोबत आणलेल्या मुलींकडून अश्लील हावभाव करुन नाच करायला लावत होते. या प्रकरणी 4 नर्तिकासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण?

लोणावळा शहरातील तुंगार्ली परिसरातील बंगल्यातील प्रांगणात काही लोक सार्वजिनिक शांततेचा भंग करुन रात्री उशीरापर्यंत साऊंड सिस्टम लावुन मोठमोठ्याने गाणी लावून त्यांनी सोबत आणलेल्या मुलींकडून अश्लील हावभाव करुन नाच करायला लावत आहेत, लोणावळा पोलिसांना मिळाली होती.  त्यानुसार सगळ्यांनी मिळून बंगल्यावर छापा टाकला. अश्लिल हावभाव करुन साऊंड सिस्टम लावुन मोठमोठ्याने गाणी लावुन नाच करुन सार्वजनिक शांततेचा भंग करीत असलेल्या एकूण 9 जणांना ताब्यात घेतलं. साऊंड सिस्टिमदेखील पोलिसांनी जप्त केली आहे. 

 बंगला भाड्याने देताना  बंगल्यामध्ये कोणतेही बेकायदेशीपणे कृत्य होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी आणि बंगला भाड्याने दिलेली माहिती पोलीस स्टेशनला सादर करावी अन्यथा त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी बंगला मालकांना दिला आहे. 

लोणावळा शहरातील भाड्याने दिले जाणाऱ्या या बंगल्याची माहिती संकलित करण्याचे काम लोणावळा शहर पोलिसांकडून केले जाणार आहे. त्यामुळे ज्यांचे बंगले भाड्याने दिले जात आहेत, त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधुन आपल्या बंगल्याची माहिती सादर करावी. असे पोलिसांनी आवाहन केले आहे.

 काहीच दिवसांपूर्वी लोणवळ्यातील एका आलिशान  बंगल्यावर पॉर्न व्हिडीओ शुट करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावेळी बंगला मालक आणि मॅनेजरसोबत 14 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. बंगल्यावर पॉर्न व्हिडीओ शूट करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी पॉर्न व्हिडीओ शुट होत असलेल्या बंगल्यावर छापा टाकला होता.

इतर महत्वाची बातमी-

Chandrashekhar Bawankule : श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी बावनकुळे मैदानात; मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी बारणे यांचा विजय महत्वाचा म्हणत कार्यकर्त्यांना बजावलं!

Ajit Pawar : मोठी बातमी! इंदापुरात शरद पवारांना धक्का, कट्टर समर्थक सोनाईचे माने कुटुंब अजित पवारांसोबत!

Ajit Pawar : मोदींशिवाय कोणताही पर्याय विरोधीपक्षात दिसत नाही; अजित पवार

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts