gt vs lsg k l rahul lucknow super giants make score of 163 runs against gujarat titans

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लखनौ: आयपीएलमध्ये (IPL 2024) लखनौ सुपर जाएंटस (Lucknow Super Giants) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात लढत सुरु आहे. यंदाच्या आयपीएलमधील ही २१ वी लढत आहे. लखनौचा कॅप्टन के.एल. राहुलनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लखनौला या निर्णयाचा फायदा घेता आला नाही. नियमित अंतरानं विकेट गेल्यानं लखनौला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. 

गुजरातपुढं विजयासाठी किती धावांचं आव्हान?

लखनौ सुपर जाएंटसनं पहिल्यांदा फलंदाजी करताना के.एल. राहुल, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पुरन, आयुष बदोनी यांच्या धावांच्या जोरावर ही धावसंख्या उभारली. लखनौ सुपर जाएंटसनं 20 ओव्हर्समध्ये 5 विकेटवर  163 धावा केल्या आहेत.  

गुजरातची चांगली गोलंदाजी

लखनौ सुपर जाएंटस आणि गुजरात टायटन्स आज तिसऱ्या विजयाच्या उद्देशानं मैदानात उतरले आहेत. लखनौचा कॅप्टनं  के.एल. राहुलनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र, गुजरात टायटन्सनं पहिल्याच ओव्हरमध्ये लखनौला धक्का दिला. लखनौ सुपर जाएंटसचा सलामीवीर क्विंटन डी कॉक 6 धावा करुन बाद झाला. उमेश यादवनं त्याची विकेट घेतली. उमेश यादवनंच लखनौला दुसरा धक्का देवत्त पडिक्कलच्या विकेटच्या रुपानं दिला. 

के.एल. राहुल आणि मार्कस स्टॉयनिस या दोघांनी लखनौचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी चांगली भागिदारी देखील केली मात्र दोघांचं स्ट्राइक रेट मात्र कमी होतं. लखनौचा कॅप्टन  के.एल. राहुलनं 31 बॉलमध्ये 33 धावा केल्या. तर दुसरीकडे मार्कस स्टॉयनिसनं 43 बॉलमध्ये  58 धावा केल्या. आयुष बदोनीनं 20 धावा केल्या. निकोलस पूरननं यानं 32 धावा केल्या. के.एल. राहुल आणि स्टॉयनिस यांना बाद करत गुजरात टायटन्सनं लखनौ सुपर जाएंटसला बॅकफूटवर ढकललं. 

लखनौ की गुजरात तिसरा विजय कोण मिळवणार?

गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जाएंटस यांच्यात  आतापर्यंत आयपीएलमध्ये चार मॅच झालेल्या आहेत. या चार मॅचमध्ये गुजरातनं विजय मिळवलेला आहे. आज लखनौकडे हे चित्र बदलण्याची संधी होती. मात्र, लखनौला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं आहे. लखनौ सुपर जाएंटसनं आतापर्यंत दोन मॅचमध्ये विजय मिळवला होता. तर, दुसरीकडे गुजरात टायटन्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये चार मॅच खेळलेल्या होत्या.त्यामध्ये गुजरात टायटन्सला दोन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. आजच्या मॅचमध्ये गुजरात टायटन्स कमबॅक करतं का ते पाहावं लागणार आहे.    

संबंधित बातम्या : 

MI vs DC : अखेर मुंबईनं विजयाचं खातं उघडलं, दिल्लीची पराभवाची मालिका कायम, पृथ्वी-स्टब्सची अर्धशतकं व्यर्थ

Virat Kohli : विराटची बॅटिंग पाहून चाहतीनं राजस्थानला दिला धक्का, कोहलीच्या शतकावेळी आरसीबीला पाठिंबा, व्हिडीओ व्हायरल

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts