Maval Lok Sabha Election Jawaharlal Nehru amended the Constitution 17 times and Indira Gandhi 28 times Says Ajit Pawar Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे :  विकासाची वज्रमुठ बांधून आपल्याला नरेंद्र मोदींना पंतप्रधान (PM Modi)  करायचं आहे. ही निवडणूक विचारांची नाही तर विकासाची आहे. विरोधक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळातील घटना दुरुस्तीवर भाष्य करतात. विरोधकांकडून नको ते मुद्दे उचलले जातायेत. त्याला काही अर्थ नाही. इंदिरा गांधींकडून (Indira Gandhi) 28 वेळा घटना दुरुस्ती केली आहे.  तर  मोदींकडून सहा वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे.  घटना दुरुस्ती आणि बदल समजून घ्या असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. मावळ लोकसभेत आयोजित केलेल्या महायुतीची समन्वय बैठकीत ते बोलत होते. 

अजित पवारांची  पदाधिकाऱ्यांना तंबी

  विरोधक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळातील घटना दुरुस्तीवर भाष्य करतात. विरोधकांकडून नको ते मुद्दे उचलले जातायेत. त्याला काही अर्थ नाही. विरोधी उमेदवाराला प्रचारादरम्यान भेटायला जाऊ नका. परत म्हणाल दादा फक्त गप्पा मारायला गेलो होतो. मी तसलं काही ऐकून घेणार नाही. आपली महायुती आहे, महायुतीचा धर्म पाळायला हवा. मैत्री, नातं-गोतं, भावकी-रावकी बाजूला ठेवा. ही निवडणूक देशाची आहे, अशी तंबी अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. 

श्रीरंग बारणे हाच आपला उमेदवार : अजित पवार

विरोधी  उमेदवार (संजोग वाघेरे) कदाचित असं सांगेल की, अजित दादांनी मला उभं राहायला सांगितलं आहे. असं अजिबात नाही.  अख्खा महाराष्ट्र जाणतो मी असलं काही करत नाही. आपला उमेदवार हा श्रीरंग बारणे आहे, धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबा, भूलथापांना बळी पडू नका,असेही अजित पवार म्हणाले.

विरोधक बोलायचं म्हणून काहीही बोलतात : अजित पवार 

विकासाची वज्रमुठ बांधून आपल्याला नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे.ही निवडणूक विचारांची नाही तर विकासाची आहे. 140 कोटींमध्ये 70 कोटी महिला आहेत. आता प्रत्येक महिलांच्या खात्यात 1 लाख टाकायची गॅरंटी द्या म्हणतात. आता मला सांगा असं केलं तर भारत जगातील सर्वाधिक कर्जबाजारी देश होईल. विरोधक बोलायचं म्हणून काहीही बोलत आहेत, असे देखील अजित पवार म्हणाले. 

अजित दादा आले, लवकरचं पार्थ पवार  प्रचारात दिसतील; श्रीरंग बारणेंचा दावा

पार्थ पवारांचा पराभव पचनी पाडून, वडील अजित पवार आज मावळ लोकसभेत सक्रिय झालेत. पार्थचा पराभव करणारे श्रीरंग बारणेंचा प्रचार अजित पवारांनी सुरू केलाय. आता पार्थला ही प्रचारासाठी आमंत्रित करणार अन तो ही माझं प्रचार करेल. असा दावा बारणेंनी केला आहे.

हे ही वाचा :

Maharashtra Politics : राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पोस्टमधून चक्क ‘दादा’चं गायब, अजित पवारांच्या जागी मोदींचा फोटो

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts