Maha Vikas Aghadi Seat Sharing Dispute On Sangli Lok Sabha Farewell to Sharad Pawar from Delhi Congress Proposal Jalna Lok Sabha To Uddhav Thackeray marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maha Vikas Aghadi Seat Sharing : सांगली लोकसभा मतदारसंघाची (Sangli Lok Sabha Constituency) जागा महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) चांगलीच डोकेदुखी बनली आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेकडून (Shiv Sena) सांगलीतून चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी जाहीर केली असून, दुसरीकडे काँग्रेस (Congress) नेते विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) हे विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. आता यात आणखी नवीन घडामोड पाहायला मिळत असून, स्वतः काँग्रेस हायकमांड देखील सांगलीच्या (Sangli) जागेसाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, सांगलीचा तिढा सोडवण्यासाठी आणि मध्यस्थी करण्यासाठी शरद पवारांना (Sharad Pawar) थेट दिल्लीतून निरोप आल्याची माहिती आहे. तसेच, ही मध्यस्थी यशस्वी झाल्यास शरद पवार गटाला भिवंडीत होणारा काँग्रेसचा विरोध मागे घेतला जाणार असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने दिले आहे. 

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना सांगलीतून उमेदवारी मिळावी यासाठी सोनिया गांधी स्वतः आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, उद्धव ठाकरेंनी आधीच चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा करून टाकली आहे. विशेष म्हणजे कोणत्याही परिस्थितीत सांगलीतून माघार घेणार नसल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. अशात आता उद्धवसेनेला सांगलीऐवजी जालन्याच्या प्रस्ताव काँग्रेसच्या हायकमांडकडून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे मध्यस्थी करण्यासाठी शरद पवारांना दिल्लीतून निरोप पाठवण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे. तर आज संध्याकाळी महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यापूर्वी आज मोठ्या घडामोडी घडण्याच्या शक्यता आहे. 

मध्यस्थी झाल्यास भिवंडीत पाठिंबा देण्यास काँग्रेस तयार 

सांगलीच्या जागेसाठी मध्यस्थी करण्यासाठी शरद पवारांना दिल्लीतून निरोप आले असून, त्या बदल्यात त्यांना भिवंडीत पाठिंबा देण्यास काँग्रेस तयार आहे. शरद पवार गटाचे भिवंडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रेना काँग्रेसने विरोध केल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, शरद पवारांनी सांगलीच्या जागेसाठी योग्य मध्यस्थी केल्यास, काँग्रेसकडून भिवंडीतील विरोध मागे घेण्यात येईल, असेही दिल्लीतील निरोपात म्हटल्याचे ‘दिव्य मराठी’च्या वृत्तात म्हटले आहे. 

उद्धवसेनेला सांगलीऐवजी जालन्याच्या प्रस्ताव…

सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहावा यासाठी काँग्रेसच्या हायकमांड देखील सकारात्मक असल्याने यावर तोडगा काढण्यासाठी नवीन फॉर्म्युला देखील देण्यात आला आहे. उद्धवसेनेला सांगली लोकसभा मतदारसंघाच्या ऐवजी जालना लोकसभा मतदारसंघाचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे जालना लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला उमेदवार मिळत नसल्याची चर्चा आहे. अशात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंची देखील जालन्यात ताकद कमी झाली आहे. त्यामुळे सांगलीचा तिढा कसा सुटणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

MNS Gudi Padwa Melava : मनसेचा गुढीपाडवा मेळावा! राज ठाकरे काय बोलणार? भाजप-मनसे युतीची घोषणा करणार?

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts