ajit pawar appeal to baramati voter to vote for sunetra pawar against ncp supriya sule sharad pawar lok sabha election update marathi 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : आजपर्यंत तुम्ही पवारांच्या मागे उभा राहिलात, आताही मतदान करताना ज्या ठिकाणी पवार दिसेल त्या ठिकाणी मतदान करा, म्हणजे पवारांना मतदान केल्याचं तुम्हाला समाधान मिळेल असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. आतापर्यंत तुम्ही साहेबांना (Sharad Pawar) आणि मुलीला (Supriya Sule) मतदान केलं आता सुनेला मतदान करण्याची वेळ आल्याचंही ते म्हणाले. 

अजित पवार हे बारामतीकरांना आवाहन करताना म्हणाले की, तुम्ही आधी साहेबांना मतदान केलं. त्यानंतर मुलाला म्हणजे मला मतदान केलं. नंतर तुम्ही मुलीला मतदान केलं. आता सुनेला मतदान करा. म्हणजे पवारांना मतदान केल्या तुम्हाला समाधान मिळेल.

जिथे पवार दिसेल तिथे मतदान करा

अजित पवार म्हणाले की, जेव्हा मी राजकारणाची सुरुवात केली तेव्हा तिशीत होतो. आता साठी पार केली आहे. त्यामुळे ही निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे. महायुतीचा उमेदवार कोण द्यायचा याचा विचार केला, मग सुनेत्रा पवारांचे नाव पुढे आलं. आता कुणाला मतदान करायचं हा प्रश्न लोकांना पडला. त्यामुळे ज्या ठिकाणी पवार दिसेल त्या ठिकाणीच मतदान करा.

मोदी देशाच्या विकासासाठी झटतात

या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मी देखील टीका केली आहे, पण आताची परिस्थिती वेगळी आहे असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. ते म्हणाले की, मोदींनी कधी सुट्टी घेतली नाही. मोदी फक्त देशाचा विकास कसा होईल हे बघतात. बारामतीत आतापर्यंत केंद्राचा मोठा पैसा आला आहे. बारामतीचे रेल्वे स्टेशन पुढे फलटणला जोडावे यासाठी मी 15 वर्षे प्रयत्न करत असून त्यासाठी मोदींना भेटलो. 

140 कोटींचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय मतदार घेणार आहेत. 18 तारखेला आपल्या उमेदवाराचा अर्ज आपल्याला भरायचा आहे. बारामती, पुणे, शिरूरचा अर्ज भरायचा आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असून तुम्हीही वेळ काढून हजर राहा. 

बारामतीमधील राजकारणाला वेग

महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा होताच बारामतीमधील राजकारणाने कमालीचा वेग घेतल्याचं दिसतंय. या आधी अजित पवारांना विरोध करणारे विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटलांनी त्यांची भूमिका बदलली असून त्यांनी आता सुनेत्रा पवारांची साथ द्यायचा निर्णय घेतला आहे. तर सुप्रिया सुळेंसाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरल्याचं दिसतंय. 

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts