MNS leader Bala Nandgaonkar said that MNS Chief Raj Thackeray never thought about his own gain and loss.

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

MNS Raj Thackeray: मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) गुढीपाडवा मेळावा मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर सुरु आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आज काय बोलणार याकडे केवळ मनसैनिकच नाही, तर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. थोड्याच वेळात राज ठाकरे आपल्या भाषणाला सुरुवात करतील. मात्र याआधी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी भाषण केलं. 

बाळा नांदगावकर म्हणाले की, राज ठाकरे आज काय बोलणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरेंनी कधीही स्वत:च्या फायद्याचा आणि तोट्याचा विचार केला नाही. राज ठाकरेंनी जेव्हा गुजरातचा दौरा केला. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. यावेळी नरेंद्र मोदींच्या कामाचं खुल्या मनानं कौतुक केलं होतं. तसेच काही न पटल्यास राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींनी टीकाही केली होती, अशी आठवण बाळा नांदगावकर यांनी करुन दिली. 

‘मोदींना साथ देण्यासाठी राज ठाकरेंनी सोबत यावं : चंद्रशेखर बावनकुळे

‘मोदींना साथ देण्यासाठी राज ठाकरेंनी सोबत यावं असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय. तर राज ठाकरे आणि मनसेचा सन्मान करणं आमचं कर्तव्य असून, आजच्या मेळाव्यातून राज राज ठाकरे चांगला निर्णय घेती असा विश्वासही बावनकुळेंनी व्यक्त केलाय. 

मनसे-भाजपा युतीची चर्चा

महायुतीत मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा सहभाग व्हावा असं भाजपला वाटतंय. त्याचमुळे राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात दिल्लीमध्ये एक बैठकही झाली. त्या बैठकीत दक्षिण मुंबईची जागा मनसेला सोडण्यात येईल अशी चर्चा होती. तसेच शिर्डीच्या जागेचाही विचार होत असून त्या ठिकाणाहून मनसेच्या बाळा नांदगावकरांचं नाव चर्चेत होतं. पण दक्षिण मुंबईची जागा राज ठाकरेंच्या उमेदवाराने कमळ या चिन्हावर लढवावी अशी भूमिका भाजपमधील एका गटाने घेतल्याची माहिती समोर आली होती. कोणत्याही परिस्थितीत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नाही अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतल्याने मधल्या काळात मनसे आणि भाजपची चर्चा थांबल्याचं दिसलं. त्यात महायुतीचे जागावाटप आता अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे. भाजपने जाहीर केलेल्या जागांपैकी दक्षिण मुंबई आणि शिर्डी या ठिकाणचे उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आले नाहीत. त्यामुळे मनसे अद्यापही महायुतीत सामील होऊ शकते अशी चर्चा आहे.

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts