Mercury transited in Leo sign In the next 15 days people of this zodiac sign will print notes

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Budh Margi Effect 2023: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक त्याच्या ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. दरम्यान बुध ग्रहाचं स्वतःचं महत्त्व असतं. बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा आणि लहान ग्रह आहे. कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रहाचे स्थान बलवान असेल तर त्या व्यक्तीला मान-प्रतिष्ठा मिळते. 

नुकतंच बुध ग्रह मार्गी झाला आहे. 16 सप्टेंबर रोजी बुध सिंह राशीत मार्गस्थ झालाय. दरम्यान बुध ग्रहाच्या या सरळ चालीचा प्रभाव सर्व 12 राशीच्या लोकांच्या जीवनावर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशींसाठी हा काळ खूप शुभ राहणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशींसाठी बुध ग्रहाचं मार्गस्त होणं सकारात्मक असणार आहे.

मिथुन रास 

ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह प्रत्यक्ष असल्यामुळे मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनावर शुभ प्रभाव पडतो. यावेळी करिअरच्या प्रगतीसाठी जबरदस्त मार्ग उघडणार आहे. यावेळी अनेक कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी प्रोफाइलमध्ये योग्य बदल दिसतील. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळवण्यात यश मिळू शकणार आहे. कुटुंबाकडून सहकार्य मिळणार आहे. बुधाच्या मार्गस्थ होण्याने तुम्हाला धनलाभ होणार आहे.

सिंह रास 

बुध मार्गी झाल्याने तुमची प्रलंबित कामं पूर्ण होणार आहे. करिअरमध्ये अपेक्षित परिणाम मिळणार आहे. या काळात तुम्ही योग्य निर्णय घेण्यात यशस्वी होणार आहात. व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात अनेक अडचणींवर मात करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. या काळात तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होऊ शकणार आहे.  

धनु रास

ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांची स्वप्नं पूर्ण होताना दिसतायत. यश मिळविण्यासाठी हा काळ खूप चांगला मानला जातो. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार नोकरीच्या संधी मिळू शकणार आहेत. कोर्ट- कोर्ट केसेसमध्ये तुमच्या बाजूने निर्णय येऊ शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. रखडलेल्या कामांना गती मिळेल.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts