Election Wedding Card made by Punekar in Pune Marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Election wedding Card Pune : मतदान जनजागृतीसाठी पुणेकरांनी तयार केली लग्नपत्रिका पुण्यात एका विवाहाची निमंत्रण पत्रिका चर्चेचा विषय ठरलीय. ही पत्रिका आहे चि. मतदार आणि चि. सौ. का. लोकशाही यांच्या लग्नाची. पुणेकरांनी मतदानासाठी अनोखी लग्नपत्रिका तयार केली आहे.१३ मे रोजी पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. त्यासाठी ही निमंत्रण पत्रिका असून १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला या माध्यमातून मतदानाचे आमंत्रण देण्यात आलं आहे.लग्नपत्रिकेत मतदार वर असून लोकशाही वधू आहे. मतदार हा देशाच्या नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव आहे. लोकशाही ही संविधानाची ज्येष्ठ कन्या आहे. या दोघांचा शुभविवाह १३ मे रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ५ या शुभमुहूर्तावर होणार आहे, असा उल्लेख लग्नपत्रिकेत केला आहे.

[ad_2]

Related posts