VBA candidate vasant more reaction on raj thackeray mns Support narendra Modi gudi padwa melava shivaji park speech

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे  (Raj Thackeray) यांनी आपण नरेंद्र मोदींना (Vasant More) बिनशर्त पाठिंबा देणार असं जाहीर केलं. त्यानंतर वसंत मोरेंनी योग्य निर्णय घेतला, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या. राज ठाकरेंच्या भूमिकेवर वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  पक्ष सोडल्यापासून मी कोणाचाही विचार केला नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवर मी बोलू शकत नाही, असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर कोणतंही उत्तर देणं टाळलं आहे. ते पुण्यात बोलत होते. त्यासोबत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. 

त्यासोबत त्यांनी भाजपवर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले, शहराचा विकास करणं अशक्य नाही आहे. रवींद्र धंगेकरांनी विकास केला असेल तर लोक त्यांना नक्की मतदान करेल. मी सहासी विधानसभा मतदार संघाचा सगळा अभ्यास केला आहे. मी खासदार झालो की संपूर्ण शहराचा विकास करणार आहे. विकासाच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीने पुणेकरांना गृहीत धरण बंद करावं, असं ते म्हणाले आहेत. कसबा पॅटर्न पेक्षा विकासाचा कात्रज पॅटर्न पुणे शहरात चालेल. भाजपचं चारशे पाच स्वप्न स्वप्नच राहणार आहे. माझा फॉर्मुला 30 तारखेनंतर तुम्हाला पाहायला मिळेल. मी शंभर टक्के पुण्यातून आघाडी घेणार असल्याचा विश्वास वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे. 

त्यासोबत पुणे शहरासंदर्भाच्य विकासाबाबतदेखील त्यांनी भाष्य केलं आहे आणि त्यांनी काही प्रश्न देखील  पुणे शहरात ट्राफिक नियोजन करण्यासाठी ट्रॅफिक इंजिनिअर का नाही?, पुणे शहरात सगळ्यात मोठा प्रश्न वाहतुकीचा, पाण्याचा,  कचऱ्याचा आहे, ते प्रश्न अजूनही प्रलंबित का आहेत?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. पुणे शहराचा विकासाची ब्लू प्रिंट माझ्याकडे तयार असल्याचंही ते म्हणाले. पुण्यातून मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार आणि  वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून दिल्लीला जाणार आहे. निवडून आल्यानंतर शर्मिला ठाकरेंचा आशीर्वाद घ्यायला जाणार, असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

वसंत मोरे यांनी मनसेला राम राम ठोकला, हा त्यांचा निर्णय योग्य असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. अशी भूमिका घ्या की आपलेच कार्यकर्ते नाही तर समोरचे कार्यकर्तेही संभ्रमात पडले पाहिजेत,  भूमिका अशी घ्या की कार्यकर्ते मानसिक रुग्ण झाले पाहिजेत,  फक्त एक ईडीच्या नोटीसने उभा महाराष्ट्र सरळ करणारा माणूस स्वतः सरळ झालाय, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. 

इतर महत्वाची बातमी-

Amol Kolhe : अमोल कोल्हेंचा घोड्यावरुन प्रचार; मी घोड्यावर बसलो की काही जणांच्या पोटात लय दुखतं; अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts