lok sabha election 2024 roadshow of rahul gandhi and priyanka gandhi for ravindra dhangekar in pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुणे लोकसभा मतदार संघात तिहेरी (Pune Loksabha Election) लढत होणार आहे. त्यात महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तिन्ही तगडे नेते मानले जात आहे. त्यामुळे निवडणूक अटीतटीची होणार आहे. तिघांच्या प्रचारासाठी महत्वाचे नेते मैदानात उतरणार आहे. त्यातच आता  महाविकास आघाडीकडून प्रचाराचे नियोजन करण्यात आलं आहे. प्रचारासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे रोड शो होणार आहेत.  शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे, अशी माहिती रवींद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) दिला आहे. 

साधारण पुणे लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात हे रोड शो आणि सभा होणार आहेत.या सभांच्या मार्फत वातावरण निर्मीती केली जाणार असल्याचं रवींद्र धंगेकरांनी सांगितलं आहे. साधारण हे सगळे नेते माझ्या प्रचारासाठी पुण्यात येणार आहे. त्यांच्या येण्याने या निवडणुकीत मोठा फायदा होणार आहे. शिवाय निवडणूक ही मोदींच्या विरोधात लढवली जाणार आहे. अनेकांना मोदींचं नेतृत्व मान्य नाही, त्यामुळे मोदींच्या विरोधातील लोक आम्हाला मतदान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

कॉंग्रेसमध्येच ‘नाराजी नाट्य’

मागील काही दिवसांपासून कॉंग्रेसमध्येच धूसफूस सुरु असल्याचं दिसत आहे. त्यांच्या बैठकीत काहीशी वादावादी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची नाराजी पाहायला मिळाली तर फोटोवरुन माजी आमदाराच्या मुलाने मंडपवाल्याला मारहाण केल्याचंदेखील समोर आलं होतं. त्यामुळे साधारण कॉंग्रेसमध्येच नाराजी नाट्य सुरु असल्याचं पाहायला मिळालं. याच कॉंग्रेसच्या नाराजी नाट्याचा फटका रवींद्र धंगेकरांना विरोधकांपेक्षा जास्त बसणार का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

पुण्यात कसबा पॅटर्न चालणार का? 

विधानसभेच्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावलं आणि विजय खेचून आणला. त्यावेळी हू ईज धंगेकर म्हणून त्यांना हिणवलं गेलं मात्र तेच धंगेकर विजयी झाले. यावेळी धंगेकरांना शिक्षणावरुन ट्रोल केलं जात आहे. विरोधकांकडून खासदार आठवी पास म्हणून त्यांना हिणवलं जात आहे. पुण्यात कसबा पॅटर्न चालणार अशी चर्चादेखील काही ठिकाणी रंगताना दिसत आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Pune News : चि. मतदार, चि.सौ.का. लोकशाही;   पुण्यात अनोखी लग्नपत्रिका व्हायरल; तरुणांना मतदानाचे आवाहन

Murlidhar Mohol : तरुणांसाठी रिल्स तर जेष्ठांसाठी घरोघरी दौरे; मुरलीधर मोहोळांचा दणक्यात प्रचार सुरु

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts