Recruitment process started for various posts in Indian railway department job news 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Indian Railway Recruitment : सरकारी नोकरी (Government  Job) शोधणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. रेल्वेमध्ये (Railway) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळं पात्र उमेदवार या संधीचा लाभ घेऊन सरकारी नोकरी (Job) मिळवू शकतात. नेमकी किती पदासांठी भरती निघाली आहे. अर्ज कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोठी संधी आली आहे. रेल्वेत एकूण 733 पदांसाठी भरती निघाली आहे. या संधीचा पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर लाभ घ्यावा. या 733 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ही भरती प्रक्रिया दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून राबवली जातेय. 

भरती प्रक्रियेसाठी अर्ज कसा कराल?

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या 733 पदांसाठी ही भरती निघाली आहे. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. तुम्हाला secr.indianrailways.gov.in या साईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. सध्या भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही  12 एप्रिल 2024 आहे. त्यामुळं त्यापूर्वीच तुम्ही अर्ज करु शकता. 

या जागांसाठी पात्रता काय?

रेल्वे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विविध पदासांठी 10 वी पास आणि आयआयटी पास उमेदवारांची गरज आहे. हेच उमेदवार फक्त या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करु शकतात. यासाठी वयोमर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांचे वय 24 वर्षांपेक्षा कमी आहे, त्यांनाच या सर्व पदांसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळं उमेदवार 24 वर्षाच्या पुढील वयाचे असतील त्यांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार नाही. 

थेट पद्धतीनं निवड होणार

या विविध जागांसाठी निघालेली भरती प्रक्रियेसाठी मुलाखती किंवी लेखी परिक्षा होणार नाही. थेट फद्धतीनेच उमेदवारांची भरती केली जाणार आहे. त्यामुळं जे उमेदवार यासाठी अर्ज करणार आहेत, त्यांना परिक्षेचे नो टेन्शन असणार आहे. त्यामुळं जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. विशेष म्हणजे 10 वी पास झालेल्या उमेदवारांना देखील या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळं सरकारी नोकरीची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. फक्त या नोकरीसाठी 24 वर्षाची अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळं ज्यांना या जागांच्या संदर्भात अधिक माहिती हवी असेल त्यांनी रेल्वे विभागाच्या secr.indianrailways.gov.in या साईटवर पाहावी.

महत्वाच्या बातम्या:

IB Recruitment 2024 : इंटेलिजन्स ब्युरोमध्ये बंपर भरती; अर्ज कसा करायचा? पगार किती मिळणार? वाचा सविस्तर…

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts