Congress Candidate List : रावसाहेब दानवेंच्या विरोधात जालन्यातून कल्याण काळे तर धुळ्यातून शोभा बच्छाव, काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई: काँग्रेसची राज्यातील उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली असून जालन्यातून कल्याण काळे यांना तर धुळ्यातून डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे कल्याण काळे आता भाजपच्या रावसाहेब दानवेंशी (Raosaheb Danve) निवडणुकीच्या रिंगणात दोन हात करणार आहेत. तर धुळ्यातून भाजपच्या सुभाष भामरे (Subhash Bhamre) यांच्याविरोधात शोभा बच्छाव लढणार आहेत.  मुंबईतील उमेदवारांची नावं मात्र अद्याप जाहीर करण्यात आली नाहीत.

कल्याण आणि जालन्यातील उमेदवार जाहीर झाल्यानंतर आता महाविकास आघाडीतील उत्तर मुंबई, मुंबई उत्तर मध्य आणि माढा या ठिकाणचे उमेदवार जाहीर होणं बाकी आहेत.

रावसाहेब दानवेंच्या विरोधात कल्याण काळे

मराठवाड्यातील एक लक्षवेधी मतदारसंघ असलेल्या जालन्यातील लढतीकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. जालन्यातून रावसाहेब दानवेंच्या विरोधात काँग्रेसने कल्याण काळे यांना उमेदवारी दिली आहे. जालना हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे या मतदारसंघातून पाच वेळा विजयी झाले आहेत. आता सहाव्यांदा ते लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत.

कल्याण काळे हे माजी आमदार असून 2009 साली त्यांनी रावसाहेब दानवेंच्या विरोधात निवडणूक लढली होती. त्यावेळी त्यांचा केवळ 8 हजार मतांनी पराभव झाला होता. नंतर 2014 आणि 2019 सालीही रावसाहेब दानवे जालन्यातून निवडून आले.

अर्जुन खोतकर काय भूमिका घेणार?

महायुतीतील शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर हे रावसाहेब दानवेंचे कट्टर विरोधक समजले जातात. त्यामुळे ते या निवडणुकीत रावसाहेब दानवेंना मदत करतील का नाही याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.

कल्याण आणि जालन्यातील उमेदवार जाहीर झाल्यानंतर आता महाविकास आघाडीतील उत्तर मुंबई, मुंबई उत्तर मध्य आणि माढा या ठिकाणचे उमेदवार जाहीर होणं बाकी आहेत.

ही बातमी वाचा:

Narendra Modi : गेल्या दहा वर्षातलं काम हे फक्त स्टार्टर, अजून लोकांसमोर पूर्ण थाळी येणं बाकी आहे; पंतप्रधान मोदींनी मांडला दहा वर्षांचा लेखाजोगा

[ad_2]

Related posts