इलेक्शन ड्युटीवर न येणाऱ्या शिक्षकांनी कारवाईसाठी तयार राहावं, निवडणूक आयोगाची हायकोर्टात ठाम भूमिका

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : जे शिक्षक निवडणुकीच्या कामासाठी येणार नाहीत, त्या संबंधित ट्रेनिंग पूर्ण करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची ठाम भूमिका केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हायकोर्टात तसं स्पष्ट केलं आहे. गुरूवारपासून सुरू होणाऱ्या ट्रेनिंग कँपवर न येणाऱ्यानी कारवाईसाठी तयार राहावं असं आयोगानं ठणकावलं आहे. विनाअनुदानित इंग्रजी शाळेतील शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून सुटका मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. पण तसाच दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे.

शिक्षकांचं मुख्य काम सोडून त्यांना निवडणुकीच्या कामात जुंपलं जात असल्याची तक्रार करत उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर निवडणूक आयोगाने न्यायालयात आपलं मत मांडल. या आधी राज ठाकरेंनी शिक्षकांच्या या कामाला विरोध केला होता.

राज ठाकरेंनी डॉक्टर, शिक्षक यांना निवडणूकीच्या कामात जुंपण्यास विरोध करत त्यांना अभय देण्याचं आश्वासन दिलं होतं. आता केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या या भूमिकेवर मनसे काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे येत्या दिवसांत हा मुद्दा तापण्याची चिन्ह आहेत.

[ad_2]

Related posts