inqlab zindabad nota on voter awareness board incidents at the gokhale institute in pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : सध्या सगळीकडे लोकसभेच्या निवडणुकीची (Pune News) तयारी सुरु आहे. त्यासाठी मतदानासाठी जागृती करण्यात येत आहे. एवढंच नाही तर काही उपक्रमदेखील राबवण्यात येत आहे. त्यातच  पुण्यातील प्रतिष्ठित गोखले राज्यशास्त्र (Gokhale Institute, Pune) आणि अर्थशास्त्र संस्थेतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  मतदान जागृतीसाठी लावलेल्या फलकावर ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘नोटा’ लिहिण्यात आलं आहे. या प्रकारामुळे काही विद्यार्थी संघटना संतापल्या आहेत. 

 गोखले संस्थेतील  इलेक्टोरल लिटरसी क्लब अँड आर्ट क्लब यांच्यातर्फे वॉल ऑफ डेमोक्रेसी तयार करण्यात आली होती. या फलकावर मतदारासंदर्भात जनजागृती करण्यात आली होती. त्यावर स्वाक्षऱ्यांसाठीदेखील जागा ठेवण्यात आली.  मतदार जागृती करण्याच्या उपक्रम राबवण्यासाठी हा फलक लावण्यात आला होता. निवडणूक आयोग, भारत सरकार, विद्यापीठ अनुदान आयोग यांले लोगो लावण्यात आले. याच बोर्डावर थेट नोटा आणि इन्कलाब जिंदाबाद, असं लिहिण्यात आल्याचं समोर आलं. सुरुवातीला हा प्रकार कोणी केला आहे. याचा थानपत्ता लागला नाही मात्र काही वेळाने सीसीटीव्ही तपासून ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रकार केला त्या दोन विद्यार्थ्यांना संस्थेने ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्याकडून चौकशी केली जात आहे. 

लोकशाहीची हत्या करणारे नेमके कोण आहेत?

हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटल्या.  पुण्यातील नामवंत इन्स्टिट्यूट गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पुणे येथील अकॅडमी बिल्डिंगमध्ये गेल्या काही दिवसांपासून लावलेल्या इलेक्शन कमिशनच्या पोस्टरवर लोकशाही विरुद्ध व देश विरोधी गोष्टी लिहून त्याची छेड-छाड करण्यात आली आहे. या पोस्टर मध्ये गोखले इन्स्टिट्यूट चा व इलेक्शन कमिशन चा लोगो वापरून नोटा या पर्यायाला मतदान करा अशा पद्धतीचा मजकूर आढळून आला.अशा पद्धतीचे बॅनर हे गोखले इन्स्टिट्यूटमध्ये गेले दोन-तीन दिवस लागले आहेत तरीसुद्धा त्यावर प्रशासनाकडून कोणत्याही पद्धतीची कारवाई करण्यात आली नाही. इन्कलाब झिंदाबाद घोषणेमागून लोकशाहीची हत्या करणारे नेमके कोण आहेत? या पोस्टची छेड-छाड करणार्यां विरोधात जर लवकरात लवकर कारवाई केली नाही तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा ABVP कडून देण्यात आला. 

विद्यार्थ्यांची चौकशी सुरु आहे; अजित रानडे

आमची संस्था 93 वर्ष जुनी आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान जागृतीसाठी बोर्ड लावण्यात आले होते. त्यावर नोटा आणि इन्कलाब जिंदाबाद असं लिहिल्याचा प्रकार समोर आला. ही घटना साधारण 36 तासांपूर्वी झाली आहे. हे समोर आलं त्यावेळी आमच्या संस्थेचे सीसीटीव्ही चेक कऱण्यात आले. त्यात दोन विद्यार्थ्यांना पकडलं गेलं आहे. त्या विद्यार्थ्यांनी माफी मागितली आहे. त्यांची चौकशी करत आहोत, असं गोखले संस्थेचे उपकुलगुरु अजित रानडे यांनी सांगितलं आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Ajit Pawar : मी जे सांगायचे ते सांगितलं, मला मूर्ख समजू नका; ‘त्या’ प्रश्नावरुन अजित पवारांनी पत्रकारांना फटकारलं!

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts