ipl 2024 mi vs rcb mumbai indians beat rcb by seven wicket with better performance of ishan kishan suryakumar yadav and jasprit bumrah

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई :  मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं विजयासाठी दिलेलं 197 धावांचं लक्ष्य पार केलं आहे. मुंबई इंडियन्सच्या डावाची आक्रमक सुरुवात सलामीवर ईशान किशन आणि रोहित शर्मानं केली. ईशान किशन आणि रोहित शर्मानं शतकी भागिदारी केली. मुंबईच्या 100 धावा झाल्यानंतर पहिली विकेट गेली. ईशान किशननं 34 बॉलमध्ये 69 धावा करुन मुंबईच्या विजयाचा पाया रचला. यानंतर मैदानात फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवनं फटकेबाजी केली. सूर्यकुमार यादवनं वादळी खेळी करत 52 धावा केल्या आणि मुंबईला विजयाजवळ नेऊन पोहोचवलं. दुसरीकडे रोहित शर्मानं देखील 38 धावा केल्या. बॉलिंगमध्ये जसप्रीत बुमराह आणि फलंदाजीत ईशान किशन आणि सूर्यकुमार यादवनं केलेल्या कामगिरीच्या जोरावर मुंबईनं सहज विजय मिळवला. हार्दिक पांड्यानं धोनी स्टाइलनं विजयी षटकार मारला. मुंबईनं 7 विकेटनं मॅच जिंकली. 

 

बातमी अपडेट होत आहे…

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts