Nawab Malik Praful Patel Controversy Over Iqbal Mirchi Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : एकीकडे नवाब मलिकांचा (Nawab Malik)  मुद्दा तापलेला असताना, विरोधकांनी या वादात प्रफुल पटेलांना (Praful Patel) ओढलं आहे.  नवाब मलिक चालत नाहीत, मग प्रफुल्ल पटेल सत्ताधाऱ्यांना कसे चालतात? हा विरोधकांचा रोकडा सवाल आहे. त्यावरूनही उत्तरांचा धुरळा उडाला आहे.  मात्र यात ऐरणीवर आलाय तो मुद्दा म्हणजे, प्रफुल पटेलांवरील आरोप. इक्बाल मिर्चीवरून (Iqbal Mirchi)  राजकारणाला वादाचा ठसका कसा लागला आहे.

भाजपला नवाब मलिक चालत नाहीत मग प्रफुल पटेल कसे चालतात? नवाब मलिकांवरुन  सत्ताधाऱ्यांमध्ये वाद सुरु झाला आहे. पण यात आता विरोधकांनीही उडी घेतली आहे. काँग्रेस आणि शरद पवार गटानं मलिकांची बाजू घेत भाजपला प्रफुल पटेलांवरुन प्रश्न विचारले आहेत.  अंबादास दानवेंनी तर थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे.  विधानसभा सदस्य नवाब मलिक यांच्याबाबत आपण व्यक्त केलेल्या तीव्र भावना वाचून आनंद झाला. नवाब मलिक यांचे देशद्रोह्यांशी संबंध असल्याने त्यांना अजित पवार यांच्या सत्ताधारी बाकावर बसण्यास आपण विरोध केला. आपण नैतिकता आणि राष्ट्रवाद याबाबत किती पक्के आहात हेच यातून दिसले.

अंबादास दानवेंचे पत्र

 अजित पवार गटाचे राष्ट्रीय नेते प्रफुल पटेल हे अलीकडेच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना भेटल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. गोंदिया विमानतळावर मधल्या काळात पटेलांनी पंतप्रधान मोदीचें स्वागत केले. याच पटेल यांचे दाऊद आणि त्याच्या हस्तकांशी संबंध आहेत. दाऊदच्या खास हस्तकाकडून पटेल यांनी आर्थिक व्यवहार केल्याने ईडीने पटेल यांची संपत्ती जप्त केली आहे. नवाब मलिक यांच्याबाबत आपल्या तीव्र भावना आहेत. तशाच भावना प्रफुल पटेल यांच्याबाबत आहेत काय? याचा खुलासा आपल्याकडून होणे गरजेचे आहे. तरी याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी आशा बाळगतो

पटेलांचे वरळीतील दोन मजले सील

इक्बाल मिर्ची आणि प्रफुल पटेलांमधल्या कथित संबंधाबाबत दानवेंनी असं पत्र लिहिल्यानंतर ठाकरे गट आणि काँग्रेसनंही यात उडी घेतली. वरळी येथील सीजे हाऊस इमारतीमधील चार मजले ईडीनं सील केले आहेत. हे चारही मजले पटेल कुटुंबाच्या मालकीचे आहेत. ईडीच्या कारवाईनंतर पटेल कुटुंबाला हे चारही मजले रिकामे करावे लागले. कुख्यात तस्कर व गँगस्टर इक्बाल मिर्ची आणि इतरांविरुद्ध दाखल झालेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीनं याच इमारतीतील इतर दोन मजलेही सील केले आहेत. दोन मजले इक्बाल मिर्चीच्या कुटुंबाच्या मालकीचे आहेत. ऑक्टोबर 2019 मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात प्रफुल पटेल यांची 12 तासांहून अधिक चौकशी करण्यात आली होती.

सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप 

 पटेल आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कंपनीनं सीजे हाऊस बिल्डिंग बांधली होती. याच भूखंडावर कुख्यात तस्कर आणि गँगस्टर इक्बाल मिर्ची यांच्या मालकीची काही मालमत्ता होती. इमारत उभी राहिल्यानंतर त्यात इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांना दोन मजले देण्यात आले होते. हे मजलेही ईडीनं मागील वर्षी सील केले आहे. भाजपनं मलिकांचा मुद्दा लावून धरले आहे  तर विरोधकांनी पटेलांचा मुद्दा पुन्हा उकरुन काढला आहे. सत्ताधारी-विरोधकांच्या या आरोप-प्रत्यारोपांमध्ये गोची मात्र अजित पवार गटाची झाली आहे.

[ad_2]

Related posts