MI vs RCB IPL 2024: RCB Player Virat Kohli Reaction virat after Crowd cheering “Kohli Ko Bowling Do”.

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

MI vs RCB IPL 2024: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bengaluru) 7 गडी राखून सहज पराभव केला आहे. आरसीबीने प्रथम खेळताना 196 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी मुंबई इंडियन्सला झंझावाती सुरुवात करून दिली. रोहित आणि किशन यांच्यात 101 धावांची उत्कृष्ट आणि स्फोटक भागीदारी झाली. 

इशान किशनने 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि त्याने 34 चेंडूत 69 धावांची खेळी केली. तर रोहितने 24 चेंडूत 38 धावा केल्या. इशान किशन आणि रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवनेही आरसीबीच्या गोलंदाजांना धुतलं. सूर्यकुमारने 273 च्या स्ट्राइ्क रेटने फलंदाजी करत 19 चेंडूत 52 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 षटकार आणि 5 चौकार टोलावले. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्यानेही 6 चेंडूत 21 धावा केल्या. 

नेमकं काय घडलं?

एकीकडे आरसीबीच्या सर्वंच गोलंदाजांची धुलाई होत असताना वानखेडे मैदानावर उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांनी ‘कोहली को बॉलिंग दो…’, अशी घोषणाबाजी सुरु केली. यावर कोहली नको, नको म्हणत दोन्ही हात कानाला लावले. यावेळी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आरसीबीकडून दिनेश कार्तिक चमकला-

आरसीबीकडून विराट कोहली (3) व विल जॅक्स (8) हे अपयशी ठरले तरी रजत पाटीदार, कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस व दिनेश कार्तिक यांनी RCB ला मोठी धावसंख्या उभारून दिली. ड्यू प्लेसिस (61) व रजत (50) यांनी 82 धावा जोडून संघाचा डाव सारवला. 38 वर्षीय दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकांत तुफान फटकेबाजी केली. कार्तिकने 23 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 53 धावा करून संघाला 8 बाद 196 धावांपर्यंत पोहोचवले.

आज लखनौ विरुद्ध दिल्लीचा सामना-

आज आयपीएल 2024 च्या हंगामात लखनौ सुपर जायंट्स Lucknow Super Giants) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सामना होणार आहे. हा सामना एकाना मैदानात रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजचा हा सामना सुरु होईल. 

संबंधित बातम्या:

MI vs RCB IPL 2024: ‘शाब्बास डीके, वर्ल्डकप…’; दिनेश कार्तिकची स्फोटक फलंदाजी, रोहित शर्माने भर मैदानात केलं कौतुक

रोहित शर्मासोबत मस्ती करताना दिसला विराट कोहली; मैदानात नेमकं काय घडलं?, पाहा Video

Virat Kohli : ग्रेट खेळाडू असेच असतात, विराट कोहलीनं एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली, वानखेडेवर नेमकं काय घडलं, पाहा व्हिडीओ

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts