Ayodhya Ram Mandir prasad fraud Notice to Amazon for selling sweets as Ayodhya Ram Temple s prasad hri ram mandir ayodhya prasad on amazon marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ayodhya Ram Temple’s Prasad Online : एकीकडे बहुप्रतिक्षित राम मंदिर (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा (Pram Pratishstha) सोहळ्याकडे देशवासियांचं लक्ष लागलं असताना दुसरीकडे राम मंदिराच्या नावाने फसवणुकीची प्रकरणंही समोर येत आहेत. अयोध्यातील राम मंदिराच्या नावाने बनावट (Fake) प्रसादाची (Prasad) ऑनलाईन विक्रीप्रकरणी (Online) केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ((Central Consumer Protection Authority) ॲमेझॉनला (Amazon) नोटीस (Notice) पाठवली आहे. राम मंदिराच्या नावाखाली गुन्हेगार वेगवेगळ्या शक्कल लढवताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी राम मंदिर प्रवेशाबाबत फसवणुकीचं प्रकरण समोर आलं होतं. आता ॲमेझॉनवर अयोध्या राम मंदिर प्रसाद नावाने मिठाई विक्री होत असल्याचं निदर्शनास आलं आहे.

राम मंदिराच्या नावाने बनावट प्रसादाची ऑनलाईन विक्री

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) Amazon India ला “श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद” या नावाने मिठाई विकल्याबद्दल नोटीस पाठवली आहे. ॲमेझॉन राम मंदिराच्या प्रसादाच्या नावाखाली मिठाई विकून फसव्या व्यापार करत असल्याची तक्रार व्यापारी संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) कडून करण्यात आली होती. या तक्रारीवर आधारित कारवाई करण्यात आली आहे.

ॲमेझॉनला केंद्र सरकारची नोटीस

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) ॲमेझॉनला ‘श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद’ या नावाने मिठाई विकल्याबद्दल नोटीस बजावली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) ॲमेझॉनला नोटीस जारी करत सात दिवसांच्या आत उत्तर मागितलं आहे. नाहीतर ॲमेझॉनविरुद्ध ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या तरतुदीनुसार आवश्यक कारवाई सुरू करण्यात येईल अशी माहिती सरकारी निवेदनात समोर आली आहे. मुख्य आयुक्त रोहित कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली, CCPA ने ‘श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद’ नावाने ‘WWW.Amazon.in’ वर मिठाईच्या विक्रीच्या संदर्भात Amazon Seller Services Pvt Ltd विरुद्ध कारवाई सुरू केली आहे.

ॲमेझॉनवर ‘राम मंदिर अयोध्या प्रसाद’च्या नावाखाली मिठाईची विक्री

व्यापारी संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (CAIT) अहवालाच्या आधारे ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. ‘श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद’च्या नावाखाली मिठाईच्या विक्रीशी संबंधित बनावट पदार्थ विक्रीमध्ये ॲमेझॉनचा सहभाग असल्याचा आरोप CAIT च्या अहवालात करण्यात आला आहे. ‘श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद’ असल्याचा दावा करणाऱ्या Amazon ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विविध मिठाई आणि खाद्य उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं CCPA च्या निरीक्षणात आढळलं असून त्याआधारे अहवाल दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts