Nagpur-Pune-Nagpur Superfast Summer Special Train to run three days a week

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुणे नागपूर प्रवाशांची संख्या (Railway) वाढली आहे. ही संख्या पाहून प्रवाशांना रेल्वे विभागाने (Train) मोठं गिफ्ट दिलं आहे. मध्य रेल्वे द्वारे नागपूर-पुणे-नागपूर सुपरफास्ट  (Pune Nagpur Pune Superfast) उन्हाळी विशेष गाड्यांची वारंवारता आठवड्यातून दोन दिवसांवरून  तीन दिवस  करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे  ज्यामुळे उन्हाळ्यात सोयीस्कर आणि कार्यक्षम प्रवास पर्यायांची वाढती मागणी नक्की पूर्ण होईल.

नागपूर ते पुणे सुपरफास्ट उन्हाळी विशेष गाडी क्र. 01165 दिनांक 18.4.2024 ते 13.6.2024 पर्यंत प्रति गुरुवारी आठवड्यातून तीन दिवस धावेल.(एकूण 9 ट्रीप)

पुणे ते नागपूर सुपरफास्ट उन्हाळी विशेष गाडी क्र. 01166 दिनांक 19.4.2024 ते 14.6.2024 पर्यंत  दर शुक्रवारी धावेल. (एकूण 9 ट्रीप).

थांबे: उरुळी, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा

2) पुणे–हज़रत निजामुद्दीन–पुणे (24 ट्रीप)

गाडी क्रमांक 01491 पुणे-हज़रत निज़ामुद्दीन साप्ताहिक  सुपरफास्ट विशेष दिनांक 12.4.2024 ते 28 .6.2024 दरम्यान (12ट्रिप)दर शुक्रवारी पुण्याहून17.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 16.45 वाजता हज़रत निज़ामुद्दीनला पोहोचेल.

गाडी क्रमांक 01492 हज़रत निज़ामुद्दीन – पुणे साप्ताहिक सुपर फास्ट विशेष दिनांक13.4.2024 ते 29.6.2024 दरम्यान (12ट्रिप ) दर शनिवारी हज़रत निज़ामुद्दीन येथून 22.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 23.55 वाजता पुण्याला पोहोचेल.

थांबे: लोणावळा,कल्याण, वसई रोड, सुरत, बडोदा, रतलाम,भवानीमंडी, कोटा, सवाई माधोपुर आणि मथुरा.

 3) पुणे-दानापूर-पुणे (8 ट्रिप)

 गाडी क्रमांक 01471 पुणे- दानापूर सुपरफास्ट द्वीसाप्ताहिक विशेष दिनांक 11.4.2024, 14.4.2024, 02.5.2024 आणि  05.5.2024 (गुरुवार,रविवार) रोजी पुण्याहून 06.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12.00 वाजता दानापूरला पोहोचेल.

आरक्षण: उन्हाळी विशेष गाडी क्रमांक 01165, 01166 साठी विशेष शुल्कावर बुकिंग दिनांक  13.04.2024 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणिwww.irctc.co.in  या वेबसाइटवर सुरू होईल.विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपयाwww.enquiryindianrail.gov.in  ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. प्रवाशांची वाझती संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातच सगळ्या प्रवाशांनी योग्य माहित घेऊनच प्रवास करावा, असं सांगण्यात आलं आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Junnar Leopard Attack : साखर झोपेतच चिमुकलीला पळवलं; आई-वडिल संतापले; बिबट्यांचे हल्ले कधी थांबणार?

Vijay Shivtare : फाटली, पलटी मारली, अजित पवार मंचावर असताना विजय शिवतारे काय काय म्हणाले?

Loksabha Eleciton : समुद्राखाली 60 फुटांवर मतादानाचा संदेश, स्कुबा डायव्हिंग करत जनजागृती

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts