आता पावसाळ्यातही मुंबई लोकलचा प्रवास होणार सुरळीत

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचते. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळं रेल्वे सेवा ठप्प होते. त्यामुळं लोकलचे वेळापत्रक बिघडते. यावरच तोडगा काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक निर्णय घेतला आहे. 

मध्य रेल्वे सीएसएमटी ते कल्याणपर्यंत रेल्वे रुळालगत असलेल्या भिंतींवर आणखी एक सुरक्षेसाठी कपाउंड लावण्याच्या तयारीत आहे. जेणेकरुन जवळपासच्या भागात राहणारे लोक रेल्वे रूळांवर कचरा फेकणार नाहीत. 

रेल्वे रुळांवर फेकला जाणाऱ्या कचऱ्यावर तोडगा काढण्यासाठी याआधी अशा प्रकारची भिंत विक्रोळी स्थानकात लावण्यात आली होती. या प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने टफन्ड मॉल्डिंग कंपोसाइट (TMC) संपूर्ण मार्गावर लावण्याचा निर्णय घेतला आहे. लोखंड किंवा स्टीलच्या जाळ्यांच्या तुलनेत TMC अधिक टिकाउ आणि स्वस्त आहे.

रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे की, विक्रोळीजवळ सहावी रेल्वे मार्गिकेच्या जवळ रेल्वेच्या संरक्षित भिंतीजवळ पाच मीटरपर्यंत फेसिंग लावण्यात आली आहे. ही फेसिंग 100 मीटरपर्यंत लावण्यात आली आहे. 

सीएसएमटी ते कल्याणपर्यंत जवळपास 60 किमीच्या मार्गिकेवर TMC फेसिंग लावण्यात आली आहे. हे काम पुढच्या 6 महिन्यात पूर्ण होणार आहे. मान्सूनच्या आधी काही ठराविक व महत्त्वाच्या जागांवर ही संरक्षक जाळी बसवण्याचे काम प्राथमिक स्तरावर करण्यात येणार आहे. यात मस्जिद, डोंगरी, करी रोड, सायन, कुर्ला आणि भांडुप या स्थानकांत पहिले काम केले जाणार आहे. 

रेल्वे प्रशासनानुसार, रेल्वे रुळांवर फेकण्यात येणाऱ्या कचऱ्याची समस्या खूप जुनी आहे. अनेकदा कारवाई करुनही कचरा फेकण्यात येतोच. मध्य रेल्वेकडून दरवर्षी या समस्येसाठी 2.72 कोटींचा खर्च केला जातो. बसवण्यात येणाऱ्या संरक्षक जाळ्यांची रीसेल व्हॅल्यू खूप कमी आहे त्यामुळं चोरी होण्याचा कोणताच धोका नाहीये. 


हेही वाचा

घडाळ्यासारखे परिधान करा मेट्रोचे तिकिट!


आयपीएलसाठी बेस्टच्या 500 बसेसचे बुकिंग

[ad_2]

Related posts