टीम इंडिया गर्विष्ठ! अन्य देशांना कमी लेखतात; वेस्ट इंडिज दौऱ्याआधी दिग्गज भारतावर संतापले

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंवर टीका होत आहे. यात आता आणखी एका दिग्गज माजी खेळाडूची भर पडली आहे.

WTC फायनलमधील पराभवानंतर वेस्ट इंडिजचे दिग्गज आणि माजी जलद गोलंदाज सर एंडी रॉबर्ट्स म्हणाले, भारतीय क्रिकेट संघ म्हणजे गर्वाचे घर आहे. भारतीय क्रिकेटमध्ये हा गर्व आहे. यामुळेच ते जगातील अन्य देशांना कमी समजतात. भारताला हे ठरवावे लागले की त्यांचा फोकस काय आहे. कसोटी क्रिकेट की मर्यादीत षटकांचे क्रिकेट. टी-२० क्रिकेट त्याच्या पद्धतीनेच खेळले जाईल.

Asia Cup 2023 : आशिया कप २०२३बाबतची मोठी घोषणा; कधी, कुठे होणार, एका क्लिकवर सर्व अपडेट
रॉबर्ट्स यानी फायनल मॅचमध्ये आघाडीचा फिरकीपटू आर अश्विनला न खेळवण्यावर अश्चर्य व्यक्त केले. अश्विनला संघाबाहेर ठेवणे हे हस्यास्पद होते. तुम्ही सर्वोत्तम फिरकीपटूला कसे काय बाहेर ठेवू शकता, हे अविश्वसनीय आहे.

इंग्लंडमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या ICC WTC फायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाने २०९ धावांनी पराभव केला होता. WTC फायनलमध्ये पराभूत होण्याची भारताची ही सलग दुसरी वेळ आहे. या लढतीत भारताची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली. याआधी पहिल्या WTC फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडने पराभव केला होता.

क्रिकेटच्या इतिहासात असा प्रकार कोणीच केला नाही; DRSचा निर्णय बदलण्यासाठी पाहा काय केलं
टीम इंडिया आता पुढील महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात २ सामन्यांची कसोटी मालिकेसह ३ सामन्यांची वनडे आणि ५ सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. WTC मध्ये झालेल्या पराभवानंतर भारतीय संघात मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. भारतीय खेळाडू आयपीएलचा हंगाम खेळडून कसोटी फायनल खेळण्यासाठी आले होते त्यामुळे त्यांना सरावासाठी वेळ मिळाला नाही असे अनेकांनी म्हटले होते.

एका महिन्यापूर्वी नियुक्ती आणि अचानक सुरू झाली राजीनाम्याची चर्चा; राजू कुलकर्णी म्हणाले…
भारताचा वेस्ट इंडिज दौरा

दोन कसोटी
पहिली कसोटी- १२ चे १६ जुलै
दुसरी कसोटी- २० ते २४ जुलै

वनडे मालिका
पहिली वनडे- २७ जुलै
दुसरी वनडे- २९ जुलै
तिसरी वनडे- १ ऑगस्ट

टी-२० मालिका
पहिली टी-२०: ०३ ऑगस्ट
दुसरी टी-२०: ०६ ऑगस्ट
तिसरी टी-२०: ०८ ऑगस्ट
चौथी टी-२०: १२ ऑगस्ट
पाचवी टी-२०: १३ ऑगस्ट

आयपीएल ट्रॉफी घेऊन तिरुपतीच्या दर्शनाला, सीएसकेकडून खास पूजा

[ad_2]

Related posts