Uddhav Thackeray Sharp attack on union home minister Amit Shah over fake shivsena calling palghar loksabha maharashtra loksabha election bjp pm modi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पालघर : नकली शिवसेना म्हणून चेष्टा करत आहेत, पण ती तुमची डिग्री आहे का? अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीएम मोदींवर हल्लाबोल केला. दुसरे एक (अमित शा) खंडणीबहाद्दर पक्षाचे महाराष्ट्रात आले आणि ते सुद्धा म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंनी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी शिवसेना स्थापन केली होती ती शिवसेना तुम्ही संपवाला निघाला आहात. मात्र, आज कोण आहेत त्यांच्यासोबत? अमित शाहांच्या गाडीत अस्सल भाजपवाले किती? तुमच्या स्टेपण्या किती आत आहेत ते बघा, हा भाडXX जनता पक्ष असल्याची घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 

विध्वंस करणारे उद्योग महाराष्ट्राच्या माथी मारायचे 

उद्धव ठाकरे म्हणाले की, पालघर जिल्ह्याचा विकास उत्तम झाला पाहिजे, पर्यटनासाठी उत्तम जिल्हा आहे. पालघरमध्ये मला वाढवण बंदर नको पण पालघरमध्ये मला एअरपोर्ट आणायचं होतं. सगळे चांगले उद्योगधंदे गुजरातला आणि इकडे वाढवण बंदर करायचं, तिकडे बारसूमध्ये रिफायनरी मीच रद्द केली होती आणि त्या जनतेचा विरोध असेल तर होणार नाही हे सुद्धा सांगतिलं होतं. सगळे विध्वंस करणारे उद्योग हे महाराष्ट्राच्या माथी मारायचे आणि चांगले उद्योग हे गुजरातला पळवायचे मोदीजी तुम्ही गुजरातचे पंतप्रधान नाही, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात.

वाढवण बंदर होऊ देणार नाही 

ते म्हणाले की, वाढवण बंदराचा विषय त्यांच्या सरकारच्या कागदावर पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही. मात्र जे चांगले उद्योग आहेत जे पर्यावरणाची हानी करणार नाहीत जे माझ्या मच्छीमार समाजाच्या पोटावरती पाय देणार नाही, असे उद्योग आणणार असल्याचे म्हणाले. माझ्यासाठी तुमची मते नसतील, तर आशीर्वाद आहे. मी आशीर्वाद मानतो म्हणून माझ्याकडून पक्ष, चिन्ह सगळं जरी काढलं तरी सुद्धा तुमचे आशीर्वाद हे आई जगदंबेच्या रूपात माझ्यासमोर उभे आहेत. 

इंडिया आघाडीचे सरकार येणारच 

ते म्हणाले की, मी अभिमानाने अगदी आत्मविश्वासाने सांगतो की, इंडिया आघाडी 300 पार करून येणार म्हणजे येणार आहे. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या हातचं असेल ते आम्ही कोणाला घोरबाडायला देणार नाही म्हणजे नाही तुम्हाला सुद्धा देणार नाही. संपूर्ण देश आहे तुमचा होता. आता दहा वर्षे खूप झाली, दहा वर्षे संपूर्ण देशाने तुम्हाला संधी दिली तर संधीचं सोनं करायच्या ऐवजी तुम्ही माती करून टाकली आता बस झालं. 

त्यांनी पुढे सांगितले की, पूर्वी असं वाटत होतं की मजबूत देश पाहिजे असेल तर सरकार मजबूत पाहिजे आता माझ्या लक्षात आले की जर का देश मजबूत पाहिजे असेल तर सरकार संमिश्र पाहिजे, मिली जुली सरकार पाहिजे आणि एका पक्षाचा आणि एका व्यक्तीचे सरकार हे देशामध्ये हुकूमशाला जन्म देऊ शकतो तो आता दिला आहे. त्याला आत्ताच जर का आपण गाडून टाकला नाही आणि आपल्या सगळ्या इंडिया आघाडीचे संमिश्र सरकार या देशात आणलं नाही तर मग आपल्या देशाला कोणी वाली राहणार नाही ती भारत माता सुद्धा बोलेल अरे काय रे तुम्ही माझं स्वातंत्र्य तुम्ही टिकू शकला नाहीत. माझ्या देशाचे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी ही निवडणूक आपल्याला जिंकावीच लागेल. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts