Pune Farmer Success Story Gautam Rathod From Maval Successful In Saffron Farming Pune Agriculture News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : हौसला बुलंद हो, तो मंजीले दूर नही होती, हे वाक्य पुणे जिल्ह्यातील तळेगावातील गौतम राठोड (Gautam Rathod) हे जगताना दिसत आहेत. वयाच्या चाळीशीत कॅन्सरचे निदान झालं, त्यात एक किडनी काढावी लागली, अशात वीस वर्षे सुरू असलेला व्यवसाय बंद करण्याची वेळ आली. तरीही राठोड यांनी धीर न सोडता घरातच (Saffron farm)  केसर शेती फुलविण्याचा यशस्वी प्रयोग सत्यात उतरवला आहे. त्यांच्या धीराची, हिंमतीची आणि त्यांच्या या आगळ्यावेगळ्या शेतीची सध्या चांगलीच चर्चा रंगत आहे. 

गौतम राठोड यांनी आपल्या घरातच एका खोलीत केसरची शेती फुलवली आहे. सुरुवातीला ते गार्डनिंंगचं काम करत होते. मात्र हे काम हंगामी असल्याने त्याना आर्थिक गाढा नीट चालत नव्हता. त्यानंतर त्यांनी गॅरेजमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला होता. 20 वर्ष गॅरेज आणि मेकॅनिकल क्षेत्रात काम केलं. मात्र त्यानंतर त्यांच्या आयुष्यातला कठिण काळ सुरु झाला. त्यांच्या किडनीत गाठ आली. सर्व तपासण्या केल्यानंतर किडनीतील गाठ कॅन्सरची असल्याचं समजलं. हे समजल्यावर काळी काळ ते खचले मात्र त्यानंतर त्यांनी पुन्हा उभारी घेण्याचं ठरवलं. 

केसर शेतीची सुरुवात कशी झाली?

कॅन्सरशी सहा ते आठ महिने लढा दिला. याचदरम्यान असंख्य वेदना त्यांनी सोसल्या मात्र ज्यावेळी त्यांची प्रकृती नीट होताना दिसली त्यावेळी न डगमगता गौतम यांनी काम करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना केसर शेतीसंदर्भातील माहिती असलेला व्हिडीओ पाठवला. तो व्हिडीओ पाहून त्यांनी केसर शेती करण्याचा निर्णय घेतला मात्र या शेती संदर्भातील माहिती गोळा करण्यासाठी त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. त्यानंतर त्यांनी एका नव्या पद्धतीने म्हणजे एरोफोनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. व्हर्टीकल फार्मिग पद्धतीने त्यांनी ही केसर शेती फुलवली आहे. 

उत्पन्न किती मिळतं?

या शेतीच्या माध्यामातून दरवर्षी अर्धाकिलो केसरचं उत्पादन घेतलं जातं. एक ग्रॅम केसरची किंमत सातशे ते आठशे रुपये आहे. एका हंगामात किमान तीन वेळा याचं उत्पादन घेतलं जातं. याच शेतीच्या माध्यमातून ते आज आयुष्यातल्या सगळ्या संकटांवर मात करुन लाखो रुपये कमवत आहेत.

इतर महत्वाची बातमी-

Beed : कोरोना काळात 24 तास घराबाहेर, मराठा आंदोलनामुळे मात्र षंढ म्हणून घरात बसण्याची वेळ, आमदार सुरेश धस यांची खंत 

[ad_2]

Related posts