Gondia News Tigress left in Navegaon-Nagzira Tiger Reserve goes missing within three days which came from Tadoba Tiger Reserve maharashtra marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

गोंदिया : वाघाचं जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी ताडोबा (Tadoba) इथून आणलेल्या वाघिणीचं नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात (Navegaon Nagzira Tiger Reserve) स्थानांतरण करण्यात आलं होतं. मात्र, अवघ्या तीन दिवसातच ती वाघीण (Tiger) गायब झाली असल्याची बातमी समोर आली आहे. या वाघिणीवर नियंत्रण ठेवता यावं यासाठी तिला सॅटेलाईट जीपीएस कॉलरही लावण्यात आलं होत. त्यावरुन गेल्या दोन दिवस तिच्यावर नियंत्रण ठेवण्यात आलं होत. मात्र, त्यानंतर तिला लावण्यात आलेलं कॉलर जंगलात एकाच जागेवर दिसून येत असल्यानं नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता, सॅटेलाईट जीपीएस कॉलर नागझिरा अभयरण्यातील कक्ष क्रमांक 95 मध्ये जमिनीवर पडलेले आढळले आहे. त्यामुळं हा कॉलर आयडी वाघीणीनं काढला असावा का, किंवा तिची शिकार तर झाली नाही ना, असे अनेक प्रश्न या निमित्याने उपस्थित होता आहे. परिणामी, यादृष्टीनं नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी या वाघिणीचा शोध घेत असून पुढील तपास करत आहेत.

अवघ्या तीन दिवसात वाघीण बेपत्ता

नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढावी यासाठी मागील वर्षी 20 मे ला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ताडोबातील नर आणि मादा अशा दोघांना नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडलं होत. त्यानंतर नुकतेच ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील एका दोन वर्षीय वाघिणीला नवेगाव -नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडून तिचं पुनर्वसन केलं. ही मादा एन टि-3 वाघीण असून  नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील नागझिरा अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात निसर्गमुक्त करण्यात आलं होत. त्यावेळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या चमूच्या सहाय्याने ट्राक्युलाइज करून या वाघिणीला जेरबंद करण्यात आलं होतं.

सॅटेलाईट जीपीएस कॉलर आढळून आल्याने खळबळ 

वाघिणीला सोडल्यानंतर सॅटेलाईट जीपीएस कॉलर आणि व्हिएचएफ (Satellite GPS collar and VHF) च्या सहाय्यानं वाघिणींचं सनियंत्रण केलं जाणार असल्याची माहिती त्यावेळी देण्यात आली होती. तसेच या वाघीणीवर संपूर्ण सनियंत्रणाचे कार्य हे कमांड आणि कंट्रोल रूम साकोली येथून नियंत्रीत केले जाणार असल्याचेही त्यावेळी सांगण्यात आले होतं. या एक स्थलांतरीत वाघिणींच्या निरीक्षणानंतर आणि उर्वरित घटक लक्षात घेऊन इतर मादा वाघांना टप्प्या-टप्प्यानं स्थानांतरीत केलं जाणार असल्याचे सांगण्यात आले असतानाच ही एन टि-3 वाघीण बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. परिणामी वनविभागाची सर्व संबंधित यंत्रणा कामाला लागली असून या वाघिणीचा शोध सध्या घेण्यात येत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts