( प्रगत भारत । pragatbharat.com)
Trending News In Marathi: अलीकडच्या काळात जोडीदारासोबत ओळख वाढवण्यासाठी किंवा त्याला नीट पारखून घेण्यासाठी डेटवर जातात. किंवा पहिल्यांदा जोडीदाराला भेटत असतानाही त्यांच्यासोबत डेटवर जातात. एखादे रेस्तराँ, पार्क, रिसॉर्ट किंवा क्लबमध्ये भेटतात. इथे खाणे-पिणे आणि फिरण्याव्यतिरिक्त एकमेकांची ओळख वाढते आणि नाते पुढे नेण्यास मदत होते. मात्र, एका तरुणासोबत भलताच प्रकार घडला आहे. तरुण जेव्हा पहिल्यांदा त्यांच्या गर्लफ्रेंडला भेटायला गेला मात्र तिथे कसं काही घडलं की त्याने थेट पोलिस ठाणे गाठले.
मॉस्को येथे राहणाऱ्या 28 वर्षांच्या तरुणासोबत हा प्रकार घडला आहे. या तरुणाने आरोप केला आहे की, आम्ही जेव्हा पहिल्यांदा डेटवर गेलो तेव्हा एकत्रच जेवण मागवले. जेवण मागवल्यानंतर जेव्हा बिल द्यायची वेळ आली तेव्हा त्याने तिला अर्ध बिल भरण्यास सांगितले. मात्र, त्याचवेळी ती त्याच्यावर संतापली आणि बिल न भरताच तिथून पळून गेली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही आठवड्यापूर्वीच एका महिलेसोबत तिची ओळख झाली होती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघे एकमेकांच्या जवळ आले. त्यांनी एकत्र डेटवर जाण्याचा निर्णय घेतला. मॉस्कोतील मीरा अॅव्हॅन्यू येथील एक कॅफे निवडले आणि तिथे त्यांनी जेवण केले. तोपर्यंत त्यांच्यात सगळं सुरळीत चालु होतं. मात्र, जेव्हा जेवणाचे बिल आले तेव्हा दोघांमध्ये वाद झाले.
तरुणाने सांगितले की, जेव्हा मी महिलेला जेवणाचे बिल अर्धे-अर्धे करण्यास सांगितले तेव्हा तिने थेट नकार दिला. तिने म्हटलं की, तु जास्त प्रमाणात जेवण ऑर्डर केले होते तर मग मी का बिल भरु. या नंतर त्यांच्यात वाद झाले. काहि मिनिटे त्यांच्यात भांडणे झाल्यानंतर महिला उभी राहिली आणि थेट तिथून निघून गेली आणि तरुणालाच सगळं बिल भरावं लागले. त्यानंतर तरुणाने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिस या महिलेचा शोध घेत आहेत.