IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match MS Dhoni batting 20 runs in 4 balls Neha Dhupia Kareena Kapoor Khan Sara Tendulkar reaction Entertainment latest update detail marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL 2024 MI vs CSK : आयपीएलच्या (IPL 2024) हंगामात बहुप्रतिक्षित असलेला मुंबई (Mumbai Indians) आणि चेन्नईचा (Chennai Super Kings) सामना आज वानखेडेच्या मैदानावर खेळवण्यात आला. नेहमीप्रमाणेच यंदाही वानखेडेचं मैदान धोनीच्या बॅटींगनं गाजलं. चार चेंडू शिल्लक असताना धोनी मैदानात आला. धोनी मैदानात येताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. अवघ्या चार चेंडून 20 धावा करत धोनीने वानखेडेच्या मैदावर धावांचा पाऊस पाडला. दरम्यान यावेळी मैदानावर मुंबईच्या सपोर्टला आलेल्या बॉलीवूडकरांनाही शांत बसावं लागलं. 

हार्दीक पांड्याच्या चेंडूवर धोनीने षटकांचा पाऊस पाडला. पहिल्या तीन चेंडूतच धोनीने तीन षटकार मारत वानखेडेच्या मैदानावर एकच वातावरण तयार केलं. यावेळी मुंबईच्या सपोर्टसाठी आलेल्या चाहत्यांच्या पदरात मात्र काहीश्या प्रमाणात निराशा पडल्याचं पाहायला मिळालं. त्यातच मुंबई इंडियन्सच्या सपोर्टसाठी आलेल्या नेहा धुपिया, करिना कपूर खान या बॉलीवूड सेलिब्रेटींच्या चेहऱ्यावरचे भाव देखील काहिश्या प्रमाणात बदलल्याचं चित्र होतं.   

धोनीच्या बॅटींगवर बॉलीवूडकरही शमले

दरम्यान धोनीच्या या बॅटींगच्या अंदावर मैदानावर उपस्थित असलेल्या नेहा धुपिया, करिना कपूर खान आणि सारा तेंडूलकर यांच्या रिअॅक्शनं कॅमेऱ्याचं लक्ष वेधून घेतलं. नेहा धुपिया, करिना कपूर खान आणि सारा तेंडूलकर या तिघीही मुंबईच्या संघाला चिअर करताना दिसत होत्या. पण धोनीच्या बॅटींगपुढे त्यांनाही नमतं घ्यावं लागलं. त्यामुळे त्याच्या चार चेंडूमुळे संपूर्ण मैदानावर धोनीमय वातावरण झाल्याचं पाहायला मिळालं.  

मुंबईची गोलंदाजी कशी राहिली ?

जसप्रीत बुमराहचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला धावा रोखण्यात यश आले नाही. जसप्रीत बुमराहला विकेट मिळाली नाही, पण त्यानं चार षटकात फक्त 27 धावा खर्च केल्या. मुंबईकडून गेराल्ड कोइत्जे, श्रेयस गोपाल आणि हार्दिक पांड्या यांना विकेट मिळाल्या. हार्दिक पांड्या सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्यानं दोन फलंदाजांना तंबूत धाडलं. कोइत्जे आणि श्रेयस गोपाल यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. रोमिरिओ शेफर्ड सर्वात महागडा गोलंदाज ठरला. शेफर्ड यानं दोन षटकात 33 धावा खर्च केल्या. 

ही बातमी वाचा : 

Nilesh Sable New Comedy Show : ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ कार्यक्रमाची तारीख बदलली, निलेश साबळे आणि टीम ‘या’ दिवसापासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts