hardik pandya again trolled with rohit chants even after virat kohli appeal chennai super kings mumbai indians match ipl 2024 mi vs csk

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

MI vs CSK : वानखेडे मैदानावर मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये हाय स्कोरिंग सामना पार पडला.  मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या याला वानखेडेवर चाहत्यांनी पुन्हा एकदा डिवचलं. हार्दिक पांड्या नाणेफेकीला आल्यानंतर रोहित रोहितची घोषणाबाजी करत डिवचलं. 11 एप्रिल रोजी आरसीबीविरोधात सामन्यावेळी हार्दिक पांड्याला हूटिंग करु नका, असं किंग कोहलीनं चाहत्यांना सांगितलं होतं. पण चाहत्यांनी विराट कोहलीचं एक ऐकलं नाही. आजच्या सामन्यात चाहत्यांकडून हार्दिक पांड्याची जोरदार हूटिंग करण्यात आली. 

ऋतुराज गायकवाड आणि हार्दिक पांड्या नाणेफेकीसाठी मैदानात आले होते. त्यावेळी चाहत्यांनी रोहित रोहित नावाची घोषणाबाजी केली. मैदानात चाहत्यांचा इतका जल्लोष होता, की समालोचक आणि दोन्ही कर्णधारालाही काही ऐकू येत नव्हते. याआधीच्या सामन्यातही हार्दिक पांड्याला चाहत्यांकडून जोरदार हूटिंग करण्यात आले होते. रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढल्यामुळे चाहते प्रचंड नाराज आहेत, तो सगळा राह हार्दिक पांड्यावर काढला जात आहे. हार्दिक पांड्याला हूटिंग केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

पाहा व्हिडीओ – 

मुंबई आणि आरसीबी यांच्यातील सामन्यावेळी विराट कोहलीने चाहत्यांना हार्दिक पांड्याची हूटिंग करु नका अशी विनंती केली होती. विराट कोहलीने चाहत्यांसमोर हातही जोडले होते. त्यावेळी चाहत्यांकडून हार्दिक पांड्याचं हूटिंग झालं नाही. पण आजच्या सामन्यात चाहत्यांकडून हार्दिक पांड्याचं पुन्हा हूटिंग करण्यात आलेय.  याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. 

हार्दिक पांड्या नाणेफेकीला आला तेव्हा तर चाहत्यांकडून हूटिंग कऱण्यात आलेच. पण हार्दिक पांड्या गोलंदाजी करत होता, त्यावेळीही त्याला जोरदार ट्रोल करण्यात आले. हार्दिक पांड्या गोलंदाजी करायला आला तेव्हाही स्टेडियममधील चाहत्यांकडून रोहित रोहित अशी घोषणाबाजी करण्यात आली. याचेही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. 

दरम्यान, आयपीएल 2024 हंगामात मुंबई इंडियन्सने रोहित शर्माची कर्णधारपदावरुन हाकालपट्टी करण्यात आली. मुंबईने गुजरातकडून आयात करण्यात आलेल्या हार्दिक पांड्याच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ टाकली. पण ही गोष्ट चाहत्यांना रुचली नाही. प्रत्येक सामन्यावेळी चाहत्यांकडून हार्दिक पांड्याला ट्रोल करण्यात आले. चाहत्यांकडून हार्दिकला जोरदार ट्रोलिंग करण्यात आले. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts