maharashtra politics bjp devendra fadnavis slams congress on congress manifesto modi guarantee maharashtra marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नागपूर:  भाजपचं (BJP) संकल्प पत्र नाही तर मोदीजींची (PM Modi)  गॅरंटी आहे. नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर काय  करायचं  ते संकल्पपत्रात मांडण्यात आले आहे, अशी माहिती  पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis)  दिली  आहे. तसेच काँग्रेसचा  जाहीरनामा फेल आहे. ते कधीच आश्वासन पूर्ण करत नाही. काँग्रेससाठी जाहीरनामा कागद आहे. आमच्यासाठी मोदींची गॅरंटी आहे, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.  या वेळी चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते. ते नागपुरात बोलत होते.   

देवेंद्र फडणवीस म्हणाले,  पुढची पाच वर्ष 80 कोटी नागरिकांना रेशन मोफत देण्याचा संकल्प आहे.   70 वर्षावरील नागरीकांना युनिव्हर्सल मोफत उपचार देण्याचा निर्णय झाला आहे. तृतीयपंथींयाचाही आयुषमान भारतमध्ये समावेश करण्यात आला आहे.   सिलेंडरची पद्धत्त कालबाह्य करुन पाईपने गॅस देण्याचा निर्धार आहे.   एक कोटी घरांना सोलरची सयंत्र देऊन त्याचं विजेचं बील मोफत करणार आहे.   मुद्रा योजनेत 60 टक्के महिलांना त्याचा लाभ मिळाला आहे.मुद्रा योजनेची मर्यादा 20 लाख करणार आहे. 

गावोगावी धान्य साठवण्यासाठी गोदामे तयार करणार : देवेंद्र फडणवीस

नैसर्गिक शेतीच्या  विकासावर देवेंद्र फडणवीस म्हणाले,  भाजीपाला उत्पादन वाढवण्यासाठी त्यांच्या साठवणुकीसाठी प्रयत्न करणर आहे. नैसर्गिक शेतीचा विस्तार करण्याच्या दृष्टीने कार्यक्रम आखण्यात आले आहे. पीकवीमा योजना अधिक मजबूत करण्यात येणार आहे. श्रीअन्नाला सुपरफुड म्हणून प्रमोट  केली जाणार आहे. पाटच  वर्षात 25 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली.  पाच प्रमुख पिकांच्या एमएसीपीमध्ये भरघोस वाढ करण्यात आली आहे.  फळ आणि भाज्या टिकवण्यासाठी अधिक उपाययोजना करण्यात येणार आहे. देशात पहिल्यांदात कृषी सॅटेलाईट प्रक्षेपीत करण्यात येणार आहे. गावोगावी धान्य साठवण्यासाठी गोदामे तयार केली जातील. नॅनो युरियामुळे युरियाचा वापर कमी होतो आहे. नैसर्गिक शेतीचा विकास करणार आहे.  सॅटेलाईद्वारे वातावरणाचा जो परिणाम होईल तो थांबवता येणार आहे.

स्टार्टअप्सला प्रोत्साहन दिलं जाणार : देवेंद्र फडणवीस 

पेपरफुटी विरोधात अतिशय कडक कायदा करण्यात येणार आहे.  स्टार्टअप्समुळे मोठ्या प्रमाणात रोजगार वाढत आहे. स्टार्टअपसाठी मोठी फंडिगची व्यवस्था, स्टार्टअप्सला प्रोत्साहन दिलं जाणार आहे.   ईव्ही, मॅनिफेक्चरींग, इलेक्ट्रॉनिक्स, यामध्ये चीनच्या खालोखाल पुरवठा करणारा देश बनत आहे.  एमएसएमला जास्तीत जास्त पतपुरवठा मिळवून देणं तसेच उच्च मूल्य सेवांचे सेंटर्स उघडले जाणार आहे. महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी प्रत्येक पोलीस स्थानकात शक्ती डेस्क उभारण्यात येणार आहे. नारीशक्ती वंदन कायदा अधिक अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

हे ही वाचा :

भाजपचं ठरलं! उदयनराजेंना साताऱ्याची उमेदवारी मिळणार, फडणवीसांच्या पत्रकार परिषदेत घोषणा होण्याची शक्यता

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts