Nana Patole Slams Dharamraobaba Atram on Vijay Vadettiwar will join BJP maharashtra Politics Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nana Patole : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharamraobaba Atram) यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) हे लवकरच भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार, असा दावा केला होता. या दाव्यानंतर ऐन निवडणुकीच्या काळात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून अनेक आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहे.

आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या वादात उडी घेत भाजपला मूळ मुद्द्याला बगल देऊन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यात प्रयत्न करत असल्याचा आरोप केलाय. धर्मरावबाबा आत्राम यांना गडचिरोलीचे पालकमंत्री पद न देता गोंदियाला पाठवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षात काय सुरू आहे हे लक्षात येईल. तुम्ही भाजपसोबत जर विकासासाठी गेलात तर मग विकासावर बोलायला हवं. मात्र दुसऱ्यांचे लोक चोरायचे आणि जे येत नसेल त्यांना बदनाम करायचं षडयंत्र महयुतीच्या नेत्यांकडून होत असल्याचेही नाना पटोले म्हणालेत.

मूळ विषयाला बगल देण्याचे हे षड्यंत्र 

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी स्वत: या अफवांवर भाष्य करत त्याला मूठमाती दिली आहे. मात्र असे असताना सर्वसामान्यांना मूळ विषयापासून दूर नेत कुठंतरी गुंतवून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम सध्या केलं जातंय. अशाच पद्धतीने माझा 2014 चा एक व्हिडिओ भाजपने वायरल केलाय. त्याच्यावर वेळीच कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे आम्ही निवडणूक आयोगाला कळवले आहे. हा प्रकार जनतेचा लक्षात आला असून त्यांच्या मनात भाजप विषयी प्रचंड राग आहे. या रागाला आता कसे सावरता येईल याचा एक अयशस्वी प्रयत्न भाजप करताना आपण पाहतोय. त्यांच्यासोबत असलेले जे भ्रष्टाचारी लोक आज विजय वडेट्टीवारांबद्दल बोलतात हा खोडसळपणा असून त्याला कुठलाही अर्थ नसल्याचेही नाना पटोले म्हणाले. 

नेमकं प्रकरण काय ? 

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) 4 जूननंतर भाजपमध्ये येणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री  धर्मराव बाबा आत्राम ( Dharamraobaba Aatram) यांनी केला होता.  या दाव्यानंतर राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत आलपल्लीमध्ये महायुतीच्या सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना आत्राम यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर या विषयी स्वत: विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर देत धर्मरावबाबा आत्रामांचे सर्व दावे फेटाळून लावत  जहरी टीका केली होती. धर्मरावबाबा जर खरे राजा असतील आणि खरच त्याच्या दाव्यात दम असेल तर त्यांनी ज्या हॉटेलमध्ये भेट झाली त्याचे नाव सांगावं, भाजप प्रवेशासंदर्भात झालेल्या बैठकीचा पुरावा दाखवावा, त्यांनी तसे पुरावे दिल्यास आणि आपला दावा सिद्ध केल्यास मी त्यांची गुलामगिरी करेल, असे खुले आव्हान देत वडेट्टीवार यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला होता.

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts