[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील…
Weather Update : मिचॉन्ग चक्रीवादळाचं संकट! पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता
Today Weather Update : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या मिचॉन्ग चक्रीवादळामुळे हवामानात मोठा बदल जाणवत आहे. मिचॉन्ग चक्रीवादळ तीव्र झालं आहे. या चक्रीवादळाचा परिणाम आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये सर्वाधिक होण्याचा अंदाज आहे. पुढील तीन दिवसात आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. रविवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र अधिक मजबूत होऊन त्याचं मिचॉन्ग चक्रीवादळात रुपांतर होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. आता मिचॉन्ग चक्रीवादळ तयार होत आहे. वाचा सविस्तर…
Maharashtra Weather : ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज, बळीराजावर अस्मानी संकट
Maharashtra Rain Alert : हमून चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरावर आणखी एक चक्रीवादळाचं संकट आहे. बंगाल्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. आज रविवारी हे कमी दाबाचं क्षेत्र अधिक मजबूत होऊन त्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात आज चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. राज्यात अवकाळी पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे. वाचा सविस्तर…
Assembly Election Results 2023 : आज लोकसभेच्या सेमी फायनलचा निकाल; कोण सत्ता राखणार अन् कोण सत्ता गमावणार?
Assembly Election Results 2023 : लोकसभेची (Lok Sabha 2024) सेमी फायनल म्हणून पाहिल्या जात असलेल्या चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. राजस्थान (Rajasthan Election Result 2023), मध्य प्रदेश (Madhya Pradesh Election Election Result 2023), छत्तीसगड ( Chhattisgarh Election Election Result 2023) आणि तेलंगणा (Telangana Election Election Result 2023) या चार राज्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. तर, मिझोरममधील मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे. वाचा सविस्तर…
Chhattisgarh Election Result 2023 : छत्तीसगडचा नवे मुख्यमंत्री कोण? दिग्गज नेते शर्यतीत; काँग्रेस गड राखणार की ‘कमळ’ खुलणार?
Chhattisgarh Assembly Elections Results 2023 : छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या 90 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. छत्तीसगडमध्ये नवा मुख्यमंत्री कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. देशातील 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा आज निकाल आहे. या सर्व राज्यांच्या निवडणुकांकडे 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणूनही पाहिलं जात आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोणत्या पक्षाचे किती दिग्गज आहेत, याबाबत वाचा सविस्तर…
Telangana Election Results 2023 Live Updates : तेलंगणाच्या रणांगणात तीन चेहऱ्यांची सर्वाधिक चर्चा; कोणाला गुलाल लागणार अन् कोणाचा चेहरा पडणार?
Telangana Election Results 2023 Live Updates : तेलंगणासाठी मतमोजणी सुरु झाली आहे. पोस्टल बॅलेटमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. पोस्टल बॅलेटमध्ये सत्ताधारी बीआरएस 13 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 17, भाजप 4 आणि MIM एक जागांवर आघाडीवर आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी 30 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यात 71.34 टक्के मतदान झाले. भारत राष्ट्र समिती (BRS), काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष (BJP) हे प्रमुख दावेदार आहेत. 221 महिला आणि एका ट्रान्सजेंडरसह तब्बल 2,290 उमेदवार रिंगणात आहेत. वाचा सविस्तर…
Travel Ban on China : चीनमध्ये श्वसनासंबंधित नवा धोकादायक आजार, चिमुकल्यांना विळखा; अमेरिका मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Alert on China Virus : चीनमध्ये (China News) श्वसनासंबंधित नवा धोकादायक आजार बळावताना दिसत आहे. या नव्या व्हायरसने (New Viral Disease) लहान मुलांना विळखा घातला आहे. चीनमध्ये मुलांमध्ये श्वसनाचा अज्ञात आजार आणि न्यूमोनिया पसरण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याबाबत जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. आता अमेरिकन सरकारही चीनविरोधात मोठा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाचा सविस्तर…
3rd December In History : भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांचा जन्म, अभिनेते देव आनंद यांचे निधन, भोपाळमधील वायू गळतीमुळे हजारो जणांचा मृत्यू; आज इतिहासात
इतिहासात नोंदवल्या गेलेल्या प्रत्येक तारखेप्रमाणे 3 डिसेंबरच्या दिवशी देखील अनेक चांगल्या-वाईट घटना घडल्या आहेत. आजच्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबर 1984 रोजी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये अतिशय दुर्देवी घटना घडली. 3 डिसेंबर 1984 रोजी भोपाळमधील युनियन कार्बाइड पेस्टिसाइड प्लांटमधून विषारी वायूची गळती झाली. या अपघातात हजारो लोकांचा मृत्यू झाला, तर हजारो लोक जखमी झाले. या बरोबरच हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांचे 3 डिसेंबर 1979 रोजी निधन झाले. जागतिक हॉकीच्या सर्वोत्तम खेळाडूंमध्ये त्यांची गणना होते. तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे ते खेळाडू होते. याबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत जवळपास सहा दशके आपल्या कौशल्याची, अभिनयाची आणि रोमँटिसिझमची जादू प्रेक्षकांवर पसरवणारे सदाबहार अभिनेते देव आनंद यांनीही 3 डिसेंबर 2011 रोजी जगाचा निरोप घेतला. या दिवशी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या रूपाने आपल्याला एक महान व्यक्तिमत्त्व लाभले. डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा जन्म ३ डिसेंबर 1884 रोजी झाला. वाचा सविस्तर…
Horoscope Today 3 December 2023 : आजचा रविवार खास! मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 3 December 2023 : राशीभविष्यनुसार आज म्हणजेच 3 डिसेंबर 2023 रोजी रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मिथुन राशीचे लोक आज खूप आनंदी राहतील. कन्या राशीच्या लोकांना मानसिक शांती मिळेल. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. सर्व राशीच्या लोकांसाठी रविवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर…
[ad_2]