Travis Head: Delhi bought 11 years ago for 30 lakhs, what is Travis Head’s salary now?, lets Know

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad: तब्बल 549 धावा कुटल्या गेलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 25 धावांनी नमवले. कोणत्याही टी-20 सामन्यातील हा सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम ठरला. हैदराबादने 20 षटकांत 3 बाद 287 धावा उभारल्यानंतर बंगळुरूने 20 षटकांत 7 बाद 262 धावा केल्या. हैदराबादच्या ट्रॅविस हेडचे स्फोटक शतक निर्णायक ठरले. बंगळुरूचा हा सात सामन्यांतील सहावा पराभव ठरला.

हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेडने आयपीएलमधील चौथे वेगवान शतक ठोकले. अभिषेक शर्मा-हेड यांनी केवळ 49 चेंडूंत 101 धावांची स्फोटक सलामी दिली. रिसे टोपलीने अभिषेकला बाद करून ही जोडी फोडली खरी, मात्र त्यानंतर हेड आणि हेन्रीच क्लासेन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 26 चेंडूत 57 धावांचा तडाखा दिला. हेडने केवळ 39 चेंडूत शतक ठोकले. 

ट्रॅव्हिस हेडने भारतात झालेल्या 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकांत भारताविरुद्ध शतकी खेळी केली होती. हेडच्या या खेळीमुळे भारताला विश्वचषक जिंकता आला नाही. हेडच्या याच खेळीच्या जोरावर आयपीएल 2024 साठी झालेल्या मिनी लिलावात बोली लावण्यात आली. हेडची बेस प्राइज 2 कोटी इतकी होती. त्याला हैदराबादनं 6 कोटी 80 लाख रुपयांत खरेदी केलं. चेन्नई सुपर किंग्सने देखील हेडला संघात घेण्यास रस दाखवला होता. 

हेड याआधी आरसीबीच्या होता ताफ्यात-

हेडने एकदिवसीय विश्वचषक असल्यामुळे गेल्या वर्षी आयपीएलमधून माघार घेतली होती. याआधी तो आरसीबीच्याच संघात होता. 2016 च्या लिलावात हेडला 50 लाखांत आरसीबीने विकत घेतले होते. यावेळी त्याने 10 सामन्यांत केवळ 205 धावा केल्या होत्या. तसेच हेड दिल्ली डेअरडेविल्स (आताचा दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून 2013 साली आयपीएलमध्ये खेळला. दिल्लीने हेडला 30 लाखांत विकत घेतले होते. 

549 धावा, 38 षटकार, 81 चौकार

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात आयपीएलच्या एका सामन्यात सर्वाधिक 549 धावा झाल्या. याआधी हा विक्रम हैदराबाद आणि मुंबई यांच्यातील सामन्याच्या नावावर होता, ज्यात 523 धावा झाल्या होत्या. रॉयस चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात एकूण 81 चौकार मारले गेले. या सामन्यात 43 चौकार आणि 38 षटकार दिसले. आयपीएलच्या इतिहासात एका सामन्यात सर्वाधिक चौकार मारण्याचा हा विक्रम आहे.

संबंधित बातम्या:

दिनेश कार्तिकने लगावला यंदाच्या आयपीएलमधील सर्वांत लांब षटकार; चेंडू थेट बाहेर, एकदा Video बघाच!

RCB vs SRH: 549 धावा, 38 षटकार, 81 चौकार; आरसीबी अन् हैदराबादच्या सामन्यात अनेक विक्रमांची नोंद

रोहित शर्माची भर मैदानात उतरली पॅन्ट…; पत्नी रितिकाची रिॲक्शन व्हायरल, Video एकदा पाहाच!

आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा; या 15 खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts