राजस्थानची प्रथम गोलंदाजी, अश्विन-बटलरचं कमबॅक, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
KKR vs RR : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला. कोलकाता नाईट रायडर्स घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी कऱण्यासाठी मैदानात उतरणार आहे. राजस्थानच्या संघामध्ये महत्वाचं दोन बदल करण्यात आले आहेत. दुसरीकडे कोलकात्याचा संघात कोणताही बदल नाही.

राजस्थान आणि कोलकाता संघ गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. राजस्थानच्या नावावर पाच विजयाची नोंद आहे, तर कोलकातानं चार विजय मिळवले आहेत. आजच्या सामन्यातील विजेता संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेईल. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघानं कसून तयारी केली आहे. राजस्थान संघ आजचा सामना जिंकून प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकेल. दुसरीकडे आपलं आव्हान भक्कम करण्यासाठी कोलकात्याचा संघ मैदानात उतरणार आहे. कोलकाता आणि राजस्थान दोन्ही संघाची यंदाची कामगिरी शानदार झाली आहे. आता सर्वोत्कृष्ट संघ कोणता? यासाठी आजचा सामना महत्वाचा ठरणार आहे.

कोलकात्याविरोधात राजस्थानची ताकद वाढली आहे. राजस्थानकडून जोस बटलर आणि आर. अश्विन यांच संघात कमबॅक झालं आहे. जोस बटलरकडे सध्या शानदार फॉर्म आहे, तर अश्विनच्या अष्टपैलू खेळीमुळे राजस्थानचा संघ अधिक संतुलित होणार आहे.

कोलकाता नाइट रायडर्स संघाची प्लेईंग 11 : फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नारायण, अंगकृश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), वेंकटेश अय्यर, रमनदीप सिंह, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, मिचेल स्टार्क, हर्षित राना, वरुण चक्रवर्ती

राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात कोण कोण ?: यशस्वी जायसवाल, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमेयर, रोवमन पोवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युजवेंद्र चहल, कुलदीप सेन

[ad_2]

Related posts