[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
बद्धकोष्ठतेसाठी चूर्ण
आयुर्वेदात बद्धकोष्ठतेसाठी त्रिफला चूर्ण अत्यंत फायदेशीर मानले जाते. याशिवाय बडिशेप, सैंधव मीठ, सुंठ आणि छोटी हरण पावडरदेखील अत्यंत लाभदायी मानली जाते असं बाबा रामदेव यांनी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. या चूर्णामध्ये अधिक प्रमाणा सनाय मात्र घालू नये अन्यथा पोटदुखी होऊ शकते आणि आतड्यांना हे कमकुवत बनवते.
त्रिफळा चूर्ण बनविण्यासाठी हरण, बहेडा आणि आवळा एकत्र करावे. या चूर्णाचे नियमित सेवन केल्याने बद्धकोष्ठता लवकर बरे होण्यास मदत मिळते. रात्री झोपण्यापूर्वी अथवा सकाळी उठल्यावर या चूर्णाचे सेवन करावे.
कपालभाती योग ठरतो उपयोगी
रामदेव बाबांनी बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी कपालभाती प्राणायाम करण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय सकाळी उठून त्रिफला चूर्ण गरम पाण्यातून खाण्याला प्राधान्य देण्यास त्यांंनी सांगितलं. सकाळी उठून त्रिफळा चूर्ण खाल्ल्यानंतर प्राणायम वा कपालभातीचा नियमित सराव केल्याने बद्धकोष्ठता समस्या दूर होते.
(वाचा – कॅन्सरनंतर अभिनेत्री छवी मित्तलला आता नवा आजार, काय आहे कॉस्टोकॉन्ड्राइटिस पोस्टद्वारे सांगितले)
कसे करावे कपालभाती
कपालभाती प्राणायम करण्यासाठी सर्वात आधी शरीर रिलॅक्स करा आणि मग पद्मासन घालून बसा. हात गुडघ्यावर ठेवा आणि त्यानंतर हाताने गुढघे धरून शरीर ताठ ठेवा. संपूर्ण शक्तीसह याचा वापर करा आणि दीर्घ श्वास घ्या. छातीत श्वास भरून घ्या. त्यानंतर श्वास एकदम बाहेर सोडा आणि संपूर्ण ताकदीचा वापर करून शरीरातील विषारी तत्व बाहेर काढा.
(वाचा – तुमच्या शरीरात Negative Energy आहे की नाही कसे ओळखाल, मानसिक आरोग्याला ठरतेय हानिकारक)
गरम पाणी पिण्याची सवय लावा
बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी रोज सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिण्याची सवय लावून घ्या. रोज सकाळी गरम पाणी पिण्याने पोटातील घाण साफ होते आणि बद्धकोष्ठता समस्या दूर होण्यासही मदत होते असंही रामदेव बाबा यांनी सांगितले आहे. डॉक्टरही सकाळी उपाशीपोटी उठल्यानंतर कोमट पाणी पिण्याचा सल्ला देतात, जेणेकरून पोट स्वच्छ होईल आणि शौचाला कडक होणार नाही.
(वाचा – लेप्टोस्पायरोसिस संसर्ग कसा होतो, लक्षणे आणि कसा घालावा आळा)
नाश्त्यामध्ये खा हे पदार्थ
नाश्त्यामध्ये मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने कडक शौचाला होण्याची समस्या निघून जाते. यासाठी १ वाटी मोड आलेले कडधान्य, त्यात ७ बदाम, ७ मनुके खाऊ शकता अथवा त्यामध्ये वेगवेगळ्या उकडलेल्या चण्याचा वापरही करू शकता. यामुळे पोट स्वच्छ होण्यास मदत मिळते आणि त्रास होत नाही असंही रामदेव बाबा यांनी सांगितले आहे.
फळांचा वापर
पोट स्वच्छ ठेऊन बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी काही फळंही लाभदायक ठरतात असं रामदेव बाबांनी स्पष्ट केले आहे. यामध्ये पेरू, सफरचंद आणि पपईसारख्या फळांचा तुम्ही समावेश करून घेऊ शकता. ज्या व्यक्तींना गॅसची समस्या आहे त्यांनी पेरूचा वापर करावा. तसंच देशी फळांचा अधिक समावेश करून घ्यावा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा
[ad_2]