Pune IAS Officer Ramod Bail Request In Corruption Case Denied

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Anil Ramod : केंद्रीय अन्वेषण विभागाने 9 जून रोजी रंगेहात पकडलेले पुणे विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल गणपतराव रामोड यांचा जामीन अर्ज पुणे विशेष न्यायालयाने फेटाळला. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्ग विकासासाठी घेतल्या जात आहेत, त्यांना जास्त मोबदला देण्याच्या बदल्यात 8 लाख रुपयांची लाच घेताना रामोड यांना पकडण्यात आले होते. 

अनिल रामोड  यांनी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी राष्ट्रीय महामार्ग कायद्याचे भूसंपादन लवाद म्हणून काम केले. ते सध्या येरवडा कारागृहात आहे. त्यांनी 14 जून रोजी त्यांचे वकील सुधीर शाह यांच्यामार्फत विशेष न्यायाधीश ए एस वाघमारे यांच्याकडे जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांची याचिका फेटाळण्यात आली. 10 जून रोजी राठोड यांच्याविरुद्ध सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने त्यांच्या भूसंपादन कायद्याशी संबंधित प्रकरणे आणि तक्रारींसाठी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयच्या अहवालानुसार रामोड यांनी तक्रारदाराची केस प्रलंबित ठेवली आणि तक्रारदाराने त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा त्याने 10 लाख रुपयांची लाच मागितली होती, नंतर 8 लाख रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आलं.

रामोड यांच्या झडतीदरम्यान त्याच्या बाणेरमधील मालमत्तेतून 6.64 कोटी रुपये तसेच महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त रामोडच्या पत्नीच्या नावाने नोंदणीकृत M/S वेदलक्ष्मी डेव्हलपर्स डिझायनर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बाणेर कार्यालयाची सीबीआयने झडती घेतली, त्याठिकाणी देखील काही कागदपत्रे सापडली. याशिवाय रामोड आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या 17 बँक खात्यांमध्ये सीबीआयला 47 लाख रुपये सापडले.

जमिनीचा मोबदला देण्यासाठी कमिशन म्हणून लाखो रुपयांची लाच

दरम्यान 10 जून 2023 अनिल रामोडला सीबीआयकडून न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. अनिल रामोडकडे वेगवेगळ्या शासकीय कामांसाठी भूसंपादन करण्याची आणि त्या बदल्यात शेतकऱ्यांना त्याचा मोबदला देण्याची जबाबदारी होती. पण रामोड शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी कमिशन म्हणून लाखो रुपयांची लाच मागत असे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एका शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी रामोडने 10 लाख रुपयांची लाच मागितली होती. ती स्वीकारताना त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यानंतर रामोडचे पुण्यातील शासकीय निवासस्थान, बाणेर भागातील रुतुपर्ण सोसायटीतील फ्लॅट आणि नांदेड इथल्या घरी सीबीआयकडून दिवसभर छापेमारी करण्यात आली. यामध्ये रोख रकमेसह महत्वाची कागदपत्रे सीबीआयच्या हाती लागली आहेत.

संबंधित बातमी –
Pune : अनिल रामोड यांच्या घरी रात्री उशिरापर्यंत CBI कडून तपास, सहा कोटींच्या रोकडसह कागदपत्रे जप्त

[ad_2]

Related posts