Humidity Occurs After First Rain Know The Reason Why It Becomes So Humid After The First Rain

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

First Rain: कडक उन्हानंतर पाऊस पडला की आर्द्रता (Humidity) खूप वाढते हे तुम्ही पाहिले असेलच. पहिल्या पावसानंतर दमट उष्णता जाणवते, ज्यामध्ये तुम्हाला उष्णतेसोबत खूप घाम येतो. उत्तर भारतातील लोक याला पहिल्या पावसानंतरची उष्ण गरमी म्हणतात, अशा वातावरणात कूलर किंवा पंखे देखील काम करत नाहीत. कारण यावेळी उष्णतेसोबतच पाण्याची वाफही भरपूर प्रमाणात वातावरणात असते. आता पहिल्या पावसानंतर असे का होते? असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. तर याचं उत्तर आज जाणून घेऊया.

पहिल्या पावसानंतर दमटपणा का वाढतो?

यामागे संपूर्ण विज्ञान आहे. प्रखर उष्णतेमुळे जेव्हा पृथ्वी पूर्णपणे उष्ण राहते आणि पावसाचे काही थेंब तिच्यावर पडतात, तेव्हा पृथ्वीवरून वाफ निघते आणि या वाफेमुळे ती दमट होते. हे तुम्ही एका छोट्या प्रयोगाने समजू शकता. तुमच्या घरातील तव्याचं उदाहरण घ्या, ज्यावर भाकरी बनवली जाते. जेव्हा भाकरी तयार होते आणि ती गरम असते, तेव्हा त्यावर पाण्याचे काही थेंब शिंपडा, असे केल्यावर त्यातून निघणारी वाफ तुम्हाला दिसेल. अशाच प्रकारे पृथ्वीची स्थिती असते, कडक उन्हाळ्यानंतर एकदम पाऊस पडला की वातावरणात दमटपणा येतो.

दमट हवामानासोबत आपल्याला इतका घाम का येतो?

घाम येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. वास्तविक, आपल्या शरीराचे सामान्य तापमान 37 अंश सेल्सिअस असते. पण जेव्हा बाहेरचे तापमान वाढू लागते, तेव्हा शरीर थंड होण्यासाठी घामाच्या धारा वाहू लागतात. वातावरणात आर्द्रता वाढली की घाम येण्याची प्रक्रिया जलद होते, यामुळे दमट हवामानात शरीरातून घाम वेगाने बाहेर पडतो. पण तुम्हाला असे अनेक लोक आढळतील ज्यांना सहज घाम येत नाही. अशा लोकांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतात. त्यामुळे कडक उन्हातही घाम येत नसेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा. कारण जर तुम्हाला ही समस्या बऱ्याच काळापासून असेल तर भविष्यात तुम्हाला कोणता ना कोणता गंभीर आजार उद्भवू शकतो.

बिपरजॉय चक्रीवादळामुळे पाऊस लांबणीवर

आधीच उशिराने दाखल झालेला पाऊस पुन्हा एकदा लांबण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या देशाच्या किनारपट्टीवर बिपरजॉय चक्रीवादळाचं संकट (Cyclone Biparjoy) आहे. गुजरातला (Gujrat) धडकलेल्या या चक्रीवादळाचा परिणाम गुजरातसह संपूर्ण देशाच्या हवामानावर होत आहे. दरम्यान, यामुळे देशात काही भागात ऊन तर काही भागात पाऊस अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. दरम्यान, मान्सून पुन्हा एकदा लांबण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आता 23 जूननंतर पावसाला पुन्हा सुरुवात होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

वाचा सविस्तर:

Monsoon Update : बिपरजॉय चक्रीवादळामुळे पाऊस लांबणीवर, 23 जूननंतर पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

[ad_2]

Related posts