England Created History By Depriving Australia In Ashes 2023 ; क्रिकेटच्या १४६ वर्षांत असं कधीच घडलं नाही

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात जी गोष्ट आतापर्यंत कधीच घडली नव्हती ती इंग्लंडने करत इतिहास रचला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भारताला पराभूत करून विश्व अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे गर्वहरण करत इंग्लडंने ही गोष्ट करून दाखवली आहे.इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस कसोटी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेचा पहिला सामना सध्याच्या घडीला बर्मिंगहममध्ये सुरु झाला आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने वर्चस्व राखल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा इंग्लंडने यावेळी चांगलाच समाचार घेतला आणि पहिल्याच दिवशी त्यांना जमिनीवर आणले. इंग्लंडने पहिल्याच दिवशी आपला पहिला डाव घोषित करत सर्वांना धक्का दिला आहे. त्याचबरोबर इंग्लंडने यावेळी कसोटी क्रिकेटमध्ये असा एक इतिहास रचला आहे. आतापर्यंत १४६ वर्षांच्या क्रिकेटच्या इतिहासात ही गोष्ट यापूर्वी कधीच घडली नव्हती.

इंग्लंडने पहिल्या दिवशी आपला डाव घोषित केला. ही गोष्ट इंग्लंडने दुसऱ्यांदा केली आहे. एकाच वर्षात दोनवेळा पहिल्याच दिवशी आपला डाव घोषित करणारा इंग्लंडचा हा क्रिकेट विश्वातील पहिलाच संघ ठरला आहे. आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात एकाच वर्षात दोनवेळा आपला पहिला डाव पहिल्याच दिवशी घोषित कोणत्याही संघाला करता आला नव्हता. पण इंग्लंडने ही गोष्ट मात्र करून दाखवली आहे. आतापर्यंत क्रिकेट विश्वात दक्षिण आफ्रिकेनेही दोनवेळा पहिल्या दिवशी पहिला डाव घोषित केला आहे. पण एका वर्षात त्यांनी ही गोष्ट केलेली नाही ती फक्त इंग्लंडलाच जमलेली आहे. त्याचबरोबर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांनी आपला पहिला डाव पहिल्या दिवशी घोषित करण्याचा पराक्रम एकदा केलेला आहे. पण इंग्लंडने मात्र एकाच वर्षात दोनवेळा हा पराक्रम करत आता क्रिकेटच्या १४६ वर्षांमध्ये ही गोष्ट प्रथमच करून दाखवली आहे.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

क्रिकेटच्या १४६ वर्षांच्या इतिहासात कोणालाच जी गोष्ट जमली नव्हती ती आता इंग्लंडने करून दाखवली आहे. त्यामुळे आता या मालिकेत काय होतं, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असेल.

[ad_2]

Related posts