कल्याण ते कर्जत डाऊन दिशेची वाहतूक पूर्णपणे ठप्प , दुरुस्ती करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई :  मुंबईकरांसाठी (Mumbai Local News)  अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कल्याण ते कर्जत दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण ते कर्जत डाऊन दिशेची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे, तर मुंबईकडे जाणारी वाहतूक अर्धा ते पाऊस तास उशिरानं सुरू आहे. कसारा-कल्याण मार्ग मात्र सुरळीत असल्यानं कल्याण स्थानकातून सीएसएटीकडे जाणारी वाहतूक सुरळीत आहे. अंबरनाथ इथं एका रिकाम्या लोकलच्या डब्याचं चाक रुळावरून घसरलं, ज्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. घसरलेला डबा रुळावर आणून रुळाची दुरुस्ती करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.  

मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांची वाहतूक अनिश्चित काळासाठी  विस्कळीत

अंबरनाथ येथे कल्याण ते कर्जत डाऊन दिशेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अंबरनाथ येथे एका रिकाम्या लोकलच्या एका डब्याचे चाक रुळावरून घसरले आहेत. लोकलमध्ये प्रवासी नव्हते त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जो डब्बा रुळावरून घसरलेला आहे त्याला वेगळा करून घसरलेल्या डब्याला लिफ्ट करून पुन्हा रुळावर आणण्याचे काम सुरू आहे. सध्या मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांची वाहतूक अनिश्चित काळासाठी  विस्कळीत झाल्या आहेत. 



[ad_2]

Related posts