Lakshmi Narayan Yog 2023 : लक्ष्मी नारायण योगामुळे ‘या’ राशींना लाभणार गडगंज श्रीमंती? बुध शुक्र युती उघडणार नशिब

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Lakshmi Narayan Yog 2023 : प्रत्येक महिन्यात काही ग्रहांची स्थिती बदलते. या ग्रहांच्या हालचालीमुळे मानवी आयुष्यावर परिणाम होतो. ठराविक वेळेनंतर ग्रह जेव्हा आपली स्थिती बदलतो तेव्हा ग्रहांच्या संयोगाने शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात. काही योग आपल्यासाठी नशिब पालटणारा ठरतो आणि काही अशुभ योग संकट घेऊन येतात. बुध ग्रह गोचर झाल्यानंतर आता आज बुध अस्त झाला आहे. लवकरच पु्न्हा बुध गोचर (Budh Shukra Yuti 2023) करणार आहे. त्यावेळी कर्क राशीत बुध आणि शुक्र यांची भेट होणार आहे. या संयोगाने खास आणि शुभ असा लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. 

या लक्ष्मी नारायण राजयोगामुळे काही राशींच्या आयुष्यात शुभ आणि सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. 12 राशींपैकी 3 राशींना जबरदस्त धनलाभ होणार आहे. यात तुमच्या रास आहे का जाणून घ्या. (budh shukra Yuti created lakshmi narayan yoga in kark will be zodiac sign bumper money budh gochar 2023)

तूळ (Libra)

तूळ राशीच्या लोकांचं भाग्य लक्ष्मी नारायण राजयोगामुळे सूर्यासारखं चमकणार आहे. कामाच्या ठिकाणी आर्थिक फायदा होण्याची दाट शक्यता आहे. यशाचं शिखर गाठणार आहात. नवीन भेटीतून फायदा होणार आहे. उत्पन्नात वाढ होणार आहे. 

मेष (Aries)

मेष राशीच्या लोकांना लक्ष्मी नारायण राजयोग अतिशय फलदायी ठरणार आहे. मालमत्ता किंवा नवीन गाडी खरेदीची योग आहेत. भौतिक सुखात वाढ होणार असल्याने घरात आनंदाचं वातावरण असेल. कामाच्या ठिकाणी आर्थिक फायदा होणार आहे. प्रत्येक काम वेळेत आणि चांगलं पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी असणार. 

मकर (Capricorn)

मकर राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण राजयोग अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी आनंदाची बातमी मिळणार आहे. व्यावसायिकांना धनलाभाचे योग आहेत. अविवाहित लोकांच्या आयुष्यात जोडीदाराची एन्ट्री होणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. 

 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts