britain prime minister Rishi Sunaks offered ukrain president volodymyr zlenskyy barfi made by mother

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sunak-Zelenskyy Meet : युक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर झेलेन्सकी (Volodymyr Zelenskyy) यांनी ब्रिटचे पंतप्रधान ऋषी सुनक(Rishi Sunak) यांची भेट घेतली. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल झाला आहे. ऋषी सुनक यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram) या भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे. ऋषी सुनक यांनी आपल्या आईने बनवलेली बर्फी (Indian Sweets) झेलेन्स्की यांना भरवली. या व्हिडिओला लोकांनी चांगलीच पसंती दिली आहे. 

ऋषी सुनक यांनी शेअर केलेल्या व्हिडिओबरोबर (Video) एक कॅप्शनही शेअर केला आहे. यात त्यांनी म्हटलंय, माझ्या आईने खास माझ्यासाठी भारतीय मिठाई बनवली होती, ज्याला बर्फी असं म्हटलं जातं. पण ती बर्फी देण्याचा योग जुळून येत नव्हता. अखेर एक फुटबॉल सामन्यादरम्यान हो योग जुळून आला आणि आईने मला ती मिठाई दिली. सोमवारी मी युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांची भेट घेतली, चर्चा सुरु असताना त्यांना भूक लागली, यावेळी त्यांना आईने बनवलेली बर्फी भरवली. जी त्यांना खूप आवडली, असं सुनक यांनी लिहिलंय.

हा व्हिडिओ युट्यूब चॅनेलवरही शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत झेलेन्स्की बर्फी खाताना दिसत असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक युजरने म्हटलंय तुम्ही पंतप्रधान असा कि साधारण नागरिक, आईच्या हातच्या पदार्थला तोड नसते. तर एका युजरने म्हटलंय, हे आशियाई संस्कार आहेत. 

झेलेन्स्की ब्रिटन दौऱ्यावर
युक्रेन आणि रशियादरम्यान फेब्रुवारी 2022 पासून युद्ध सुरु आहे. यादरम्यान राष्ट्रपती झेलेन्सकी यांची ब्रिटन भेट महत्त्वाची मानली जात आहे. रशियाला उत्तर देण्यासाठी नवी शस्त्रास्त्र घेण्यासाठीही भेट असल्याचं बोललं जात आहे. पुढच्या काही महिन्यात ब्रिटन सेनेकडून युक्रेनच्या लढाऊ पायलट्सना F-16 उडवण्याचं प्रशिक्षणही दिलं जाणार आहे. 

पुतिन यांचा धोकादायक चाल
रशियाच्या तुलनेत युक्रेन लहान राष्ट्र असलं तरी त्यांनी माघार घेतलेली नाही. गेलं वर्षभर युक्रेनकडून रशियाला तोडीसतोड उत्तर दिलं जात आहे. यादरम्यान रशियाचे राष्ट्रवादी व्लादिमीर पुतीन यांनी एक धोकादायक चाल रचली आहे. रशियाने बेलारुसमध्ये आण्विक शस्त्रं तैनात केली आहेत. जेव्हा देशावर हल्ल्याचं सावट असेल तेव्हा आण्विक शस्त्रांचा वापर केला जाईल असा इशारा पुतीन यांनी दिला आहे. 1945 मध्ये अमेरिकेवर आण्विक हल्ला केला होता. यात जपानचं मोठं नुकसान झालं होतं. रशियाने तैनात केलेली आण्विक शस्त्र ही त्या शस्त्रांच्या तीनपट अधिका शक्तीशाली आहेत.

Related posts