MI Vs LSG Rohit Sharma Hit Six To Naveen Ul Haq Took Virat Kohli Revenge; बदला! विराटला भिडणाऱ्या नवीन-उल-हकला रोहितने षटकार ठोकत जागा दाखवली

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लखनऊ: आयपीएल २०२३ मध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने अत्यंत चुरशीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा ५ धावांनी पराभव केला. लखनऊच्या इकाना स्टेडियमवर मुंबईला विजयासाठी शेवटच्या षटकात ११ धावा करायच्या होत्या. यावेळी युवा मोहसीन खानने अप्रतिम गोलंदाजी करत कॅमेरून ग्रीन आणि टीम डेव्हिडला लक्ष्य गाठू दिले नाही. या विजयामुळे एकीकडे लखनऊचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या जवळ पोहोचला आहे, तर दुसरीकडे मुंबईच्या आशेवर पाणी फिरताना दिसत आहे.पण या सामन्यात एक अशी घटना घडली जी विजय-पराजयाच्या पलीकडे होती. हा प्रसंग पाहून कोहलीच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल.सामन्यादरम्यान, ५ वे षटक टाकायला आलेल्या नवीन-उल-हकच्या चेंडूवर कर्णधार रोहित शर्माने जोरदार षटकार ठोकला. त्याने अत्यंत सुंदर फ्लिक शॉट लगावला. हा शॉट ठोकून हिटमॅनने नवीनला त्याचं विराट रुपच दाखवलं. नवीनने हा चेंडू १४४ किमी प्रतितासाच्या वेगाने टाकला होता.

Worlds Highest Shiva Temple: जगातील सर्वात उंच शिव मंदिर ६ अंशांनी झुकलं, १२८०० फुटांवरील गुपित काय?
टीम डेव्हिडनेही नवीनला दोन षटकार ठोकले

इतकंच नाही तर अफगाणिस्तानचा क्रिकेटर नवीन १९ वं ओव्हर टाकायला आला. तेव्हा त्याचा सामना आणखी एका धाडसी फलंदाजाशी झाला. टीम डेव्हिडने नवीनच्या या षटकात दोन षटकार आणि एक चौकार ठोकले. या एका षटकातून टीमने एकूण १९ धावा काढल्या. यावेळी लखनऊला पराभवाचा सामना करावा लागेल असं दिसत होते. पण, मोहसिनने आपल्या इम्प्रेसिव्ह गोलंदाजीने लखनऊला सामना जिंकवून दिला.

विराट कोहलीने हा सामना नक्कीच पाहिला असेल. रोहितने षटकार मारला तेव्हा त्याला तेव्हा नक्कीच अभिमान वाटला असेल. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने ज्या सहजतेने कोहलीला भिडणाऱ्या नवीन-उल-हकला षटकार ठोकला, तो त्याच्यासाठी नक्कीच आश्चर्यकारक होता.

विराट मॅम भी बोल दे, विराट कोहलीनं पापाराझीची घेतली मजा

विराट कोहली आणि नवीन-उल-हक वाद

लखनऊ आणि बंगळुरू यांच्यातील सामन्यात नवीन-उल-हक आणि विराट कोहलीमध्ये जोरदार वाद झाला होता. नंतर कोहली आणि लखनऊचा मेंटर गौतम गंभीरही आमनेसामने आले होते. त्यांच्यातही भरमैदानात बाचाबाची झाली होती. या मोसमातील हा सर्वात मोठा वाद ठरला आहे.

Yashasvi Jaiswal: यशस्वी वर्ल्डकप संघात हवाच; धडाकेबाज खेळीनंतर माजी खेळाडू थेट BCCIला म्हणाले…
व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा –

[ad_2]

Related posts