Success Story Of Two Housewives Friends Who Became Entrepreneur Under Uma Mamis Brand Sold Homemade Products To America Europe; एकत्र मॉर्निंग वॉकला जाताना सुचली आयडियाची कल्पना! नशीब पालटलं अन् सख्ख्या मैत्रिणी बनल्या उद्योजिका

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : एक आयडिया एखाद्याचं नशीब बदलू शकतं. अशीच काहीशी घटना दोन गृहिणींसोबत घडली आहे. उमा चंद्रशेखर आणि उमा नटराजन या दोघी मैत्रिणी दररोज मॉर्निंग वॉकला जात होत्या. वॉकदरम्याव त्यांच्यात नेहमी आपापल्या घराबद्दल चर्चा होत होती. एकमेकांबाबत विचारपूस होत होती. त्यांना जराही कल्पना नव्हती, की अशा चर्चांमधून त्या दोघी एखादी बिजनेस आयडिया डेव्हलप करतील.या दोन गृहिणींनी उमा मामीज नावाने एक कंपनी सुरू केली. या बिजनेसमध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई, स्नॅक्स, लोणची असे पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली. आता केवळ भारतातच नाही, तर युरोप, ब्रिटन आणि अमेरिकेतही या दोघींचे ग्राहक आहेत. त्यांना नेहमी पारंपरिक स्नॅक्सची ऑर्डर येत असते. बिजनेस चांगल्याप्रकारे सुरू झाल्यानंतर दोघींनी व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. उमा चंद्रशेखर आणि उमा नटराजन या दोघी मॉर्निंग वॉकला जाताना अनेकदा एकमेकांशी अनेक गोष्टी शेअर करत होत्या. त्याचवेळी त्यांना व्यवसाय सुरू करण्याची कल्पना सुचली.

उमा चंद्रशेखर आणि उमा नटराजन चेन्नईत राहणाऱ्या आहेत. मॉर्निंग वॉकला जाताना या दोघींची मैत्री घट्ट झाली. या दोघी अनेक वर्ष मॉर्निंग वॉकला एकत्र जात होत्या. दोघींचा गृहिणी ते उद्योजिका बनवण्याचा प्रवास २०१७ मध्ये सुरू झाला.

उमा चंद्रशेखर यांच्या मुलीचा साखरपुडा झाला होता. त्यावेळी या दोघी मैत्रिणींनी मिळून त्यांचे ट्रॅडिशनल फ्राइड स्नॅक मुरुक्कू बनवले होते. त्यावेळी त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांनी दोघींनी बनवलेल्या स्नॅक्सचं मोठं कौतुक केलं.

वडील रोजंदारीवर कामाला, लेकीला बारावीत ६०० पैकी ६०० गुण; मजुराच्या पोरीनं नाव काढलं
त्यावेळी या दोघींचा आत्मविश्वास वाढला. एका स्नॅक्समुळे त्या दोघींचा आत्मविश्वास वाढला आणि त्याच दिवशी सर्वकाही बदललं. इथूनच त्या दोघींचा गृहिणी ते व्यावसायिका असा प्रवास सुरू झाला.

आता त्या दोघींचा व्यवसाय इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे, की त्यांच्याकडे ऑर्डरची कमी नाही. केवळ दिवाळीत त्यांनी ८०००० रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या होत्या. आता हाच आकडा पुढील दिवाळीत १ लाखापर्यंत पोहोचावा अशी त्यांची अपेक्षा आहे. या दोघींच्या उमा मामीजमध्ये तयार होणाऱ्या एक किलो स्वीटची किंमत जवळपास ४५० रुपये आहे. तर काजू-बदाम अशा ड्रायफ्रूट्स असणाऱ्या मिठाईची किंमत ५५० रुपये आहे.

[ad_2]

Related posts