daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 20 June 2023

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope 20 June 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

मेष (Aries)

आजच्या दिवशी तुम्हाला जबाबदारीने मोठी कामे मिळू शकतात. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले एखादे प्रकरण मार्गी लागेल. 

वृषभ (Taurus)

आजच्या दिवशी घेतलेला एखादा निर्णय भविष्यकाळात फायदेशीर ठरू शकतो. एखादी गुंतवणूक चांगला फायदा मिळवून देईल. 

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास होऊ शकतो. एखाद्या कामात पुढाकार घेतल्यास फायदा होणार आहे.

कर्क (Cancer)

आजच्या दिवशी नोकरी आणि व्यवसायात यश मिळणार आहे. नवीन प्रेमसंबंधांना सुरुवात होऊ शकणार आहे.

सिंह (Leo)

आजच्या दिवशी नोकरी आणि व्यवसायातील तणाव दूर होण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून चांगले सहकार्य लाभणार आहे.

कन्या (Virgo)

आजच्या दिवशी कोर्टकचेरीचं एखादं प्रकरण उद्भवण्याची शक्यता आहे. नातेवाईकांकडून फायदा होण्याची शक्यता आहे.

तूळ (Libra)

या राशीच्या व्यक्तींना तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे. पैशांच्या स्थितीत सुधारणा होऊ शकणार आहे. 

वृश्चिक (Scorpio)

आजच्या दिवशी गुंतवणूकीबाबत विचार करु शकता. नवीन जबाबदारी मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज होऊ शकतात.

धनु (Sagittarius)

आजच्या दिवशी गुंतवणूक किंवा इतर आर्थिक बाबींमध्ये जवळच्यांचा सल्ला घ्यावा लागणार आहे. जोडीदाराचा सल्ला महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

मकर (Capricorn)

आजच्या दिवशी अधिकच्या कामामध्ये इतरांकडून मदत मिळणार आहे. कुटुंबातील वादविवाद संपुष्टात येणार आहेत.

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी कामं वेळेत पूर्ण होण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यवसायात आर्थिक लाभ वाढणार असून त्यामुळे तुम्ही आनंदी होणार आहात.

मीन (Pisces)

आजच्या दिवशी देण्याघेण्यात व्यवहारात तसंच नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होणार आहे. तसंच महत्त्वाची कामं रेंगाळू शकतात.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts