[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
‘मी एक अनाथ मुलगा आहे. या निवडणुकीत डॉक्टर जिंकतो की डॉक्टरांना शिकवणारा शिक्षक जिंकतो’, असं म्हणत प्रदीप ईश्वर निवडणूक प्रचाराच्या रिंगणात उतरला. त्याच्या भाषणातील आक्रमक शैली मतदारांना भावली आणि त्यांची भाषणं अख्ख्या कर्नाटकात तुफान व्हायरल झाली. प्रदीप ईश्वर याने भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी आरोग्यमंत्री के. सुधाकर यांचा १० हजांराहून अधिक मतांनी पराभव करत विजय मिळवला. या विजयामुळे तो कर्नाटक काँग्रेसमधील सर्वात तरुण आमदार बनलाय. आमदार झाल्याचं कळताच प्रदीप ईश्वर याने विजयी जल्लोष साजरा करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हातात घेऊन आनंद व्यक्त केला. अनाथ मुलगा आमदार झाल्याचा आनंद मतदारसंघाला झाला, संपूर्ण मतदारसंघ आनंदात न्हाऊन निघाला.
कोण आहेत प्रदीप ईश्वर?
२०१६ मध्ये एका विरोध प्रदर्शनातील आंदोलनातून तो चर्चेत आला.
विजिपुराला तालुका घोषित करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात येत होती
२०१७ ला एका स्थानिक टेलिव्हीजनचा अँकर बनून तो लोकप्रिय झाला
के. सुधाकर यांच्याविरुद्ध भूमिका मांडत युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करायचा
याच व्हिडिओमुळे काँग्रेस नेतृत्त्वाचं त्यांच्याकडे लक्ष गेलं
२०२३ साठी निवडणुकीचं तिकीटही मिळालं, आमदारही झाला
प्रदीप ‘परिश्रम एज्युकेशन’ मार्फत मेडिकल विद्यार्थ्यांसाठी कोचिंग घेतो
त्याची पत्नीही त्याच कोचिंगमध्ये शिकवण्याचं काम करते
विजयानंतर काय म्हणाला प्रदीप ईश्वर?
“माझ्यासारख्या एका गरीब कुटुंबातील अनाथ मुलाला काँग्रसने आमदारकीचं तिकीट दिलं. कुठलेही पैसे न खर्च करता मी जिंकूनही आलो, यावरुनच आजही लोकशाही जिवंत असल्याचे दिसून येते. मी काँग्रेस पक्षाला धन्यवाद देतो.” अशी प्रतिक्रिया प्रदीप ईश्वरने दिली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १३५ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली. या निवडणुकीत काँग्रेसच्या डीके शिवकुमार यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत फळाला आली. मात्र, कर्नाटकमधील १३५ आमदारांपैकी एक असलेल्या प्रदीप ईश्वर याच्या विजयाचीही राज्यात चर्चा सुरु आहे.
[ad_2]