[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
काय आहे इतकी मोठी देणगी देण्यामागचं कारण?
इन्फोसिसचे (Infosys) सह-संस्थापक नंदन नीलेकणी हे आयआयटी मुंबईचे विद्यार्थी आहेत, गेल्या 50 वर्षांपासून ते या संस्थेशी वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात असतात. त्यांना आयआयटी मुंबई संस्थेशी जोडले जाऊन आज 50 वर्षे पूर्ण झाली. 1973 मध्ये इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचे प्रशिक्षण घेण्यासाठी नीलेकणी यांनी आयआयटीमध्ये प्रवेश घेतला होता. या शैक्षणिक संस्थेसोबत असलेल्या संबंधाला 50 वर्षे पूर्ण झाली. प्रथम एक विद्यार्थी म्हणून, आणि नंतर 2011-2015 पर्यंत तिच्या प्रशासक मंडळावर राहण्यापर्यंत आजवर ते संस्थेशी जोडले गेलेले आहेत, त्याचीच एक पोचपावती म्हणून नंदन नीलेकणी यांनी मुंबई आयआयटीला 315 कोटी रुपये दान केले आहेत.
आयआयटी मुंबईला नीलेकणी यांच्याकडून एकूण 400 कोटी दान
आयआयटी मुंबईने जारी केलेल्या वृत्तपत्र निवेदनानुसार, याआधीदेखील नीलेकणी यांनी आयआयटीला 85 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. आता दिलेली रक्कम मिळून नीलेकणी यांनी आतापर्यंत संस्थेला एकूण 400 कोटी रुपयांची मदत केली आहे. याआधी दिलेला निधी हा नवीन वसतिगृहे बांधणे, स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला वीजपुरवठा करणे आणि देशाचे पहिले विद्यापीठ इनक्यूबेटर स्थापित करणे यासाठी होते, अशी माहिती आयआयटी मुंबईने दिली.
आयआयटी नवीन 315 कोटींच्या योगदानाचं काय करणार?
आपल्या भविष्यातील योजना मांडताना, आयआयटी मुंबईने पुढील पाच वर्षांत 4 हजार 106 कोटींच्या निधीची आवश्यकता असल्याचं सांगितलं. नीलेकणी यांनी दिलेली देणगी एक मदत म्हणून काम करेल आणि संस्थेला निर्धारित उद्दिष्टं साध्य करण्यासाठी योजना सुरू करण्यास मदत करेल, आयआयटी मुंबईने स्पष्ट केलं आहे.
योगदान देताना काय म्हणाले नीलेकणी?
“आयआयटी-बॉम्बे माझ्या आयुष्यातील एक आधारशिला आहे, ज्याने माझ्या सुरुवातीच्या वर्षांना आकार दिला आहे आणि माझ्या प्रवासाचा पाया रचला आहे. मी या प्रतिष्ठित संस्थेशी माझ्या सहवासाची 50 वर्षे साजरी करत असताना, मी आयआयटीच्या भविष्यासाठी योगदान दिल्याबद्दल कृतज्ञ आहे,” असं नंदन नीलेकणी यांनी म्हटलं आहे.
“ही देणगी केवळ आर्थिक योगदान नाही, तर आर्थिक योगदानापेक्षाही अधिक आहे; ज्या संस्थेने मला खूप काही दिलं त्या संस्थेप्रती हे फक्त एक ऋण आहे आणि उद्याचे आपले जग घडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेली वचनबद्धता आहे,” असंही ते पुढे म्हणाले.
To mark 50 years of my association with @iitbombay, I am donating ₹315 crores to my alma mater. I am grateful to be able to do this🙏
Full release: https://t.co/q6rvuMf2jn pic.twitter.com/f8OEfZ1UTq
— Nandan Nilekani (@NandanNilekani) June 20, 2023
हेही वाचा:
Extramarital Affair: बायकोला फसवून विवाहबाह्य संबंध ठेवाल तर गमवाल नोकरी; जाणून घ्या नक्की कुठे आहे असा नियम?
[ad_2]