daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 21 June 2023

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope 21 June 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

मेष (Aries)

आजच्या दिवशी ग्रहांची स्थिती पाहता खर्चात थोडी काळजी घ्या अन्यथा आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. दूरच्या भागातून व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळेल. वैयक्तिक जीवनात आनंद असेल आणि जीवनसाथी देखील रोमँटिक शैलीत असतील.

वृषभ (Taurus)

आजच्या दिवशी तुमचे कुटुंब आणि जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. व्यापारी वर्गाला त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. मुलांबद्दल विचार केल्यास त्यांची कामगिरी पाहून आनंद होईल.

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी तुम्हाला नातेवाईक आणि शेजाऱ्यांशी भेटण्याची संधी देखील मिळू शकते. कामाच्या संदर्भात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांना आज काहीसे निराश व्हावे लागेल.

कर्क (Cancer)

आजच्या दिवशी तुमची प्रशंसा होईल, परंतु यासोबत तुमच्यावर कामाचा ताणही वाढेल. भाग्य तुम्हाला साथ देईल. प्रेयसीसोबत काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

सिंह (Leo)

आजच्या दिवशी सरकारी नोकऱ्यांशी संबंधित लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल. जवळच्या लोकांसोबत अनेक मतभेद होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या जोडीदारावर काळजीपूर्वक विश्वास ठेवावा लागेल

कन्या (Virgo)

आजचा दिवस तुमच्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचा असेल. संध्याकाळी जोडीदारासोबत थोडा वेळ एकांतात घालवाल. तुम्ही शुभ कार्यात सहभागी व्हाल.

तूळ (Libra)

या राशीच्या व्यक्तींना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. मागील गुंतवणुकीतून नफा मिळेल. भाग्याच्या दृष्टीकोनातून चांगला अणार आहे.

वृश्चिक (Scorpio)

जोडीदाराच्या प्रेमळ वागण्याने तुमचा दिवस आनंदात जाईल.  परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून काही चांगली बातमी मिळेल. वकिलांना आज महत्त्वाच्या प्रकरणात विजय मिळू शकतो.

धनु (Sagittarius)

आजच्या दिवशी तुम्ही तुमचे प्रत्येक काम सहजतेने पूर्ण करू शकाल. ज्यांना परदेशात जायची इच्छा आहे, त्यांचीही इच्छा पूर्ण होईल. तुमच्या लाइफ पार्टनरसाठी काही मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता.

मकर (Capricorn)

आजच्या दिवशी नकारात्मक विचारांपासून दूर राहा. बजेटचे योग्य नियोजन करावे लागेल. नवविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन पाहुणे येण्याची शक्यता आहे

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी तुमच्या जोडीदारासोबतचे नाते खूप गोड असेल. एखाद्या गोष्टीबद्दल तुमच्या मनात अस्वस्थता असेल. आरोग्याच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी त्रासदायक असेल.

मीन (Pisces)

आजच्या दिवशी तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा वाढेल. तिघाईमुळे तुमच्या कामात गडबड होऊ शकते. भूतकाळातील काही रखडलेल्या योजना सुरू कराल.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts