IND vs PAK Match When, Where And At What Time Will Be Played ; पाकिस्तानला मिळाला अखेर भारताचा व्हिसा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : पाकिस्तानला अखेर भारताचा व्हिसा मिळाला आहे. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा कधी, कुठे आणि किती वाजता सुरु होणार आहे, याची माहिती समोर आली आहे.पाकिस्तानचा संघ हा भारतात कसा येणार, हा प्रश्न सर्वांना पडेलला होता. कारण क्रीडा संघडना नाही तर सरकार जे ठरवेल तेच होईल, अशी भूमिका यापूर्वी घेण्यात आली होती. पण आता भारत सरकारने पाकिस्तानला व्हिसा दिला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा भारतामध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कुठे, कधी आणि किती वाजता होणार आहे, याची माहिती आता पुढे आले आहे.

सध्याच्या घडीला वनडे विश्वचषकाची जोरदार चर्चा सुरु आहे. पण त्यापूर्वी भारतामध्ये दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ हा भारतामध्ये येणार आहे. या स्पर्धेसाठी आता पाकिस्तानला आता व्हिसा भारताकडून देण्यात आला आहे. हा सामना आता बंगळुरुमध्ये रंगणार आहे. हा सामना २१ जून या दिवशी खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेतील बरेच सामने हे दुपारी ३.३० वाजता होणार आहेत. पण हा सामना खास आहे, त्यामुळे हा संध्याकाळी ७.३० वाजता होणार आहे. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता आता सर्वांना असणार आहे.

या स्पर्धेत गटातील सर्व संघ प्रत्येकी एक सामने खेळणार आहेत आणि त्यानंतर बाद फेरीला सुरुवात होणार आहे. दुसरीकडे या सर्व कालावधीमध्ये भारतीय क्रिकेटचे कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने नाहीत त्यामुळे या सामन्याला जास्त चाहते उपस्थित राहतील, असे म्हटले जात आहे. त्यामुळे या सामन्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे आव्हान आता पोलिसांकडे असेल.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा नेहमीच रंगतदार होत असतो. त्यामुळे या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी चाहते आतूर असतील. त्यामुळे हा सामना कसा खेळवला जातो आणि त्यामध्ये कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

[ad_2]

Related posts