BCCI Shut Down Pakistan’s Talks On ODI World Cup ; बीसीसीआयने केली पाकिस्तानची बोलती बंद

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी पाकिस्तान एकामागून एक मागण्या बीसीसीआयकडे करत होती. भारतात येण्यापासून ते सामने खेळण्यापर्यंत पाकिस्तान बीसीसीआयपुढे कटकट करत होती. पण बीसीसीआयने आता एकच मोठा धक्का पाकिस्तानच्या संघाला दिला आहे.सुरुवातीला पाकिस्तानने आपण वर्ल्ड कप खेळायला भारतात येणार नाही, असे म्हटले होते. पण त्यानंतर आयसीसीच्या एका निर्णयानंतर पाकिस्तानने ही गोष्ट मान्य केली. त्यानंतर पाकिस्तानच्या संघाने आपण कुठे कुठे सामने खेळणार नाही, अशी एक यादी तयार केली होती. त्यामुळे बीसीसीआयला वर्ल्ड कपचे वेळापत्रक तयार करण्यात अडथळा येत होता. पण आता बीसीसीआयने पाकिस्तानला एकच मोठा धक्का दिला आहे.

पाकिस्तानला आपला अफगाणिस्तानबरोबरचा सामना चेन्नईला खेळायचा नव्हता. त्यासाठी आपल्या वेळापत्रकात बदल करायला हवा, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे याबाबत काय निर्णय घ्यायचा हे बीसीसीआय ठरवत होती, यावेळी बीसीसीआयने आयसीसीचा नियम नेमका काय आहे, यावर बोट ठेवले आहे. त्यामुळे आता बीसीसीआयने आपला निर्णय घेतला असून त्याला आयसीसीनेही दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानची बोलती बंद झाली आहे. कारण आयसीसीच्या नियमानुसार फक्त सुरक्षेच्या कारणास्तव वर्ल्ड कपचे ठिकाण बदलले जाऊ शकते. त्यामुळे या वर्ल्ड कपमध्ये अशी परिस्थिती पाहायला मिळाली नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या सामन्याचे ठिकाण का बदलायचे, हा प्रश्न बीसीसीआय आणि आयसीसीला पडला होता. त्यानुसार आता बीसीसीआय आणि आयसीसीने पाकिस्तानच्या सामन्याचे ठिकाण न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानला त्यांचा अफगाणिस्तानचा सामना हा चेन्नईमध्येच खेळावा लागणार आहे. या एका गोष्टीमुळे जे वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर करण्याचे रखडले होते, ते आता मार्गी लागणार आहे. त्यामुळे आता पुढच्या आठवड्यामध्ये वर्ल्ड कपचे वेळा,पत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

माझा नंबर बऱ्याच जणांकडे, पण कर्णधारपद सोडल्यानंतर फक्त धोनीचा मेसेज आला | विराट कोहली

भारतातील वर्ल्ड कपबाबत आता सर्व अडथळे दूर झाले आहेत, असे समोर येत आहे. त्यामुळे आता भारातमधील वर्ल्ड कप हा कोणत्याही समस्येविना होऊ शकतो, असे समोर येत आहे.

[ad_2]

Related posts