Longest Day Of The Year 2023 When Is The Longest Day Of Year Know The Facts And Science Here

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Summer Solstice 2023 : पृथ्वीवर 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस (Longest Day) असतो आणि त्यामागचं कारण म्हणजे, 21 जून रोजी सूर्य पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर असतो. पृथ्वीचा उत्तर धृव हा 21 जूनच्या दिवशी सूर्याच्या दिशेने सर्वाधिक कललेला असतो. वर्षातील सर्वात मोठ्या दिवसासोबतच 21 जूनची रात्र ही सर्वात लहान असते.

आजच्या दिवशी सूर्यकिरणे (Sunrays) पृथ्वीवर बर्‍याच काळ पडतात. सूर्याचे किरण पृथ्वीवर सुमारे 15 ते 16 तास राहतात. म्हणूनच आजचा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस (Longest Day of the year) म्हणून ओळखला जातो. आजच्या दिवसाला ‘समर सोलस्टिस’ असं देखील म्हटलं जातं. पण हे असं का होतं हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेऊया.

आजचा दिवस मोठा असण्यामागचं कारण?

21 जून रोजी सूर्य पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर असतो, त्यामुळे पृथ्वीचा उत्तर ध्रुव हा आजच्या दिवशी सूर्याच्या दिशेने सर्वाधिक कललेला असतो. यादिवशी सूर्य कर्कवृत्तात थेट डोक्यावर येतो आणि यामुळेच पृथ्वीवर या दिवशी सर्वात जास्त काळ प्रकाश पडतो. उत्तर गोलार्धात असणाऱ्या सर्वच देशांमध्ये आजच्या दिवशी सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते, या प्रक्रियेला समर सोलस्टिस (Summer Solstice) असंही म्हणतात.

आज किती तासांचा दिवस आणि किती तासांची रात्र?

पृथ्वी आजच्या दिवशी 24 तासांपैकी 13 तासांहून अधिक काळ सूर्याभोवती फिरते, म्हणजेच आज पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास सर्वाधिक काळ लागतो. त्यामुळे आजचा दिवस (Day) हा किमान 15 ते 16 तासांचा असतो आणि रात्र (Night) ही केवळ 9 ते 10 तासांची असते. आजच्याच दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होतं.

प्रत्येक देशात दिवसाचा कालावधी वेगळा

आजचा दिवस हा सर्वात मोठा दिवस असला तरी प्रत्येक देशात किती तास सूर्यप्रकाश (Sunlight) असणार याची गणितं वेगळी असतात. प्रत्येक देशात दिवसाचा कालवधी वेगळा असतो. काही ठिकाणी 13 तासांहून अधिक काळ सूर्यप्रकाश राहतो. तर काही ठिकाणी 13 तासांहून कमी काळ सूर्यप्रकाश राहतो. 

आजच्या दिवशी सूर्यापासून मिळते सर्वाधिक ऊर्जा

नासाच्या माहितीनुसार, आजच्या दिवशी सूर्यापासून सर्वाधिक ऊर्जा मिळते, जी 30 टक्के अधिक असते. उत्तर गोलार्धात 20, 21 आणि 22 जून रोजी सूर्यापासून सर्वाधिक ऊर्जा मिळते. तर दक्षिण गोलार्धात 21, 22 आणि 23 डिसेंबर रोजी सूर्यापासून सर्वाधिक ऊर्जा मिळते.  

हेही वाचा:

Facts: झोपेत झटके का लागतात? उंचावरुन पडत असल्याचा आभास का होतो? ‘हे’ आहे त्यामागचं कारण

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

[ad_2]

Related posts